गावपातळीवर जनजागृती करा; सीईओ पाटील यांचे कर्मचार्‍यांना आवाहन

गावपातळीवर जनजागृती करा; सीईओ पाटील यांचे कर्मचार्‍यांना आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीतील अधिकारी- कर्मचार्‍यांनी गावपातळीवर नागरिकांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, स्वीप समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, विजयसिंह नलावडे, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन देसाई आदी उपस्थित होते.

गेल्या सहा-सात महिन्यांपासून जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी खूप कमी असून, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदानावेळी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, या तसेच अन्य सुविधांची माहिती देऊन मतदारांना मतदानाचे आवाहन करावे.

– शालिनी कडू, प्रकल्प संचालक

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news