पुढारी ऑनलाईन डेस्क : मलेशियामध्ये नौदलाच्या सरावादरम्यान दोन हेलिकॉप्टरची हवेतच धडक झाली. या अपघातात सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आहे. पेराक राज्यातील लुमुट नौदल तळावर मंगळवारी (दि.२३) सकाळी ही घटना घडली.
रॉयल मलेशियन नेव्ही परेडच्या सरावादरम्यान हवेत दोन्ही हेलिकॉप्टरची टक्कर झाली. एका हेलिकॉप्टरचा पंखा दुसऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्याला धडकला. दोन्ही हेलिकॉप्टर स्टेडियमच्या जमिनीवर पडले. अपघाताच्या वेळी दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये १० क्रू मेंबर्स होते. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.