कार्यकर्त्यांच्या गराड्यात ‘बाबा’; ठिकठिकाणी वाढदिवस साजरा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना विविध संस्थांचे प्रतिनिधी.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना विविध संस्थांचे प्रतिनिधी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार नेते बाबा आढाव त्यांचा वाढदिवस मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथेअनोख्या रीतीने साजरा झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अन् त्यांना दीर्घायुष्य लाभण्याची कामनाही केली. यानिमित्ताने डॉ. आढाव यांच्यासह काही महिला आणि पुरुषांनी विधवा प्रथेचे निर्मूलन करू, अशी सामूहिक शपथ घेतली. तसेच डॉ. आढाव यांनी केक कापून कष्टकर्‍यांसोबत वाढदिवस साजरा केला.

कोरोनामुळे आणि डॉ. आढाव यांच्यावर सुरू असलेल्या कर्करोगाच्या उपचारामुळे त्यांचा वाढदिवस सार्वजनिकरीत्या साजरा झाला नाही. पण यंदा डॉ. आढाव यांचा वाढदिवस आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

डॉ. आढाव हे सकाळी आळंदी येथे झालेल्या आरटीओच्या फिटनेस टेस्ट ट्रॅकच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. येथे त्यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथेही मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी आणि कष्टकर्‍यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.

वालचंद संचेती, राजेंद्र बाठिया, राजेंद्र किराड, डॉ. शमसुद्दीन तांबोळी, शारदा वाडेकर, नितीन पवार आदींनी शुभेच्छा दिल्या. दिवसभर डॉ. आढाव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. डॉ. आढाव यांनी, वय वाढले म्हणून काय झाले, आमचा निर्धार कायम आहे… अशी भावना व्यक्त केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news