कामशेत : बेकायदा पिस्तूल बाळगल्याने कारवाई

कामशेत : बेकायदा पिस्तूल बाळगल्याने कारवाई

कामशेत : पुढारी वृत्तसेवा : बेकायदा गावठी पिस्तूल बाळगून गोळीबार करणार्‍यांवर कामशेत पोलिसांनी शनिवारी (दि.25) पहाटे कारवाई केली. या प्रकरणी रूपेश ज्ञानेश्वर वाघोले (30, रा. दारूंब्रे), लहु अर्जुन काळे (34 रा. सांगुर्डी ता. खेड), अमोल ज्ञानेश्वर भेगडे (38, रा. तळेगाव दाभाडे ), गोपाळ धोंडीबा गायखे (47, रा. कामशेत) यांना अटक त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामशेत गावच्या हद्दीतील वाडीवळे रेल्वेगेट जवळील एका हॉटेलच्या मोकळ्या जागेत 22 ऑगस्ट 2021 रोजी आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने रुपेश वाघवले, लहू अर्जुन काळे, अमोल ज्ञानेश्वर भेगडे, गोपाळ ऊर्फ आप्पा धोंडीबा गायखे यांच्यामध्ये चर्चा चालु असाताना रुपेश वाघवले याने प्रभाव पाडण्यासाठी त्याच्या कमरेला लावलेले बेकायदा पिस्टल काढले व हवेत गोळीबार केला.

यासंदर्भात हॉटेल मालक गोपाळ गायखे यांनी हॉटेलवर प्रकार घडल्यानंतर फायरींग करणारी मुले निघुन गेल्यानंतर हॉटेलमध्ये पडलेली बंदुकीच्या गोलीची पुंगळी टाकून दिली व घडलेला प्रकाराची पोलिसांना माहिती देणे आवश्यक असतानाही पोलिसांना माहिती न देता गंभीर गुन्हयाचा प्रकार लपवुन ठेवल्याने व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालक गायखे यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार हे करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news