

येरवडा : पुढारी वृत्तसेवा: पुणे महापालिकेअंतर्गत येणार्या सर्व प्राथमिक व माध्यमिक उर्दू शाळांना आता शनिवारऐवजी शुक्रवारी अर्धा दिवस शाळा ठेवण्यासाठी परवानगी मिळाली आहे. सन 2017 महाराष्ट्र शासनाच्या विद्या प्राधिकरण या परिपत्रकानुसार संपूर्ण महाराष्ट्राच्या महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदांच्या वतीने चालविण्यात येणार्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांची तासिका विभागणी करण्यात आली आहे.
माजी नगरसेविका फरजाना अय्युब शेख व सामाजिक कार्यकर्ते एजाज खान यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार पुणे महापालिका शिक्षण मंडळ बदल करीत नव्हते. माजी नगरसेविका फरजाना शेख व त्यांचे पती अय्युब शेख यांनी या परिपत्रकाची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त,
प्राथमिक शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी राऊत, माध्यमिक शिक्षणाधिकारी शिवाजी दौंडकर यांच्याशी संपर्क साधला. दौंडकर यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार मान्यता दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू करण्यासाठी कार्यालयीन आदेश काढण्यात आला. या निर्णयाचे मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
हेही वाचा