‘उजनी’तील पळसनाथ मंदिराला ‘या’ कारणामळे धोका..!

‘उजनी’तील पळसनाथ मंदिराला ‘या’ कारणामळे धोका..!
Published on
Updated on

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : उजनी (यशवंत सागर जलाशय) धरणाचा पाणीसाठा घटल्याने पळसदेव (ता. इंदापूर) येथील पाण्याखाली असलेले प्राचीन हेमांडपंथी पळसनाथाचे मंदिर यंदा उघडे पडले असून, हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक हे मंदिर व ओवार्‍यावर चढून फोटोग्राफी करीत असल्याने या मंदिराला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी व पुरातत्व विभागाने हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी ठोस धोरण राबवण्याची मागणी मंदिर बचाव अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत प्रा. रामदास डिंबळे व भन्ते तिस्सावरे हेदेखील पुणे जिल्हाधिकारी यांना भेटून उपाययोजना राबवण्याची मागणी करणार आहेत. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग जगताप व तालुकाध्यक्ष छगन वाळके, पक्षीतज्ज्ञ उमेश सल्ले यांनीही मंदिराचे संवर्धन गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

दरम्यान, मंदिराच्या संवर्धनासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याप्रसंगी युवराज नगरे, अनिल नगरे, दादा केवटे, कांतीलाल नगरे, केशव नगरे, समाधान नगरे, अक्षय चमरे, लाला मुलाणी, आदित्य नगरे आदी या वेळी उपस्थित होते. अनेक पर्यटक व अभ्यासक या मंदिराला भेट देण्यासाठी येत आहेत. मात्र, काही पर्यटक मंदिरावर तसेच मंदिराच्या ओवार्‍या व दगडी भिंतीवर चढून फोटोग्राफी करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news