इंदापूर : नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली भेट

इंदापूर : नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची हर्षवर्धन पाटील यांनी घेतली भेट

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : भारताच्या नूतन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्लीत भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.22) भेट घेऊन राष्ट्रपतिपदी निवड झालेबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन च्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे उपस्थित होत्या.

देशाच्या सर्वोच्चपदी प्रथमच आदिवासी कुटुंबातील सर्वसामान्य महिलेची झालेली निवड ही देशवाशियांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची व अभिमानास्पद अशी बाब आहे, असे भेटीत हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी हर्षवर्धन पाटील व अंकिता पाटील ठाकरे यांनी नूतन राष्ट्रपतीशी संवादही साधला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news