अखेर दिव्यांगांचा निधी बँक खात्यात जमा

अखेर दिव्यांगांचा निधी बँक खात्यात जमा
Published on
Updated on

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: गेले कित्येक वर्षांपासून निधी प्राप्तीपासून वंचित राहिलेल्या शिर्सुफळमधील दिव्यांगांना अखेर निधी प्राप्त झाला आहे. दैनिक पुढारीतील या संदर्भातील वृत्तानंतर संबंधित अधिकार्‍यांना जाग आली असून, त्यांनी हा निधी तत्परतेने दिव्यांगांच्या बँक खात्यांवर वर्ग केला आहे. शिर्सुफळ ग्रामपंचायत तर्फे दिव्यांगांना निधी वाटप करण्यात आला नव्हता, त्यामुळे येथील ज्ञानेश्वर खरात यांनी याबाबत संबंधित अधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला होता. मात्र, तरीही त्यांना सरकारी अधिकार्‍यांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता.

अखेर दैनिक पुढारीने दखल घेत काही दिवसांपूर्वी दिव्यांगांना निधी वाटपाबाबत होत असलेल्या दिरंगाइची बातमी तसेच संबंधितांकडून आंदोलनाचा इशारा दिल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. पुढारीच्या वृत्तानंतर अखेर ग्रामपंचायत शिर्सुफळ यांनी दिव्यांग निधी बँक खात्यात जमा केला असून, दिव्यांगांची अनेक वर्षांपासूनची समस्या मार्गी लागली आहे. दै. पुढारीच्या बातमीने आमच्या प्रयत्नांना यश आले. तसेच दिव्यांगांना निधी मिळाला म्हणून सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर खरात यांच्यासह सर्व दिव्यांगबांधवांनी दै. पुढारीचे आभार व्यक्त केले. निधी वाटपाबाबत गैरप्रकार होऊ नये, यासाठी ग्रामपंचायततर्फे निधी खात्यामध्ये जमा केल्याबद्दल ग्रामपंचायत व पदाधिकारी यांचेही आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news