

पुणे : ओसमा बिन लादेणच्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या विचारसरणीशी संबंधीत असलेल्या जुबेर इलीयास हंगरगेकर याचे अफगानिस्तान, हाँगकाँग कनेक्शन समोर आले आहे. फॉरेन्सीकच्या प्राथमिक अहवालात ही धक्कादायक माहिती आढळून आली आहे. जुबेरच्या मोबाईल आणि लॅपटॉपचे ज्ञाय वैद्यक प्रयोग शाळेत विश्लेषण केल्यानंतर (फॉरेन्सिक लॅब) मोठी माहिती तपास यंत्रणाच्या हाती लागली आहे.
जुबेरच्या टेलीग्राम ग्रुपमधील102 आयडी पैकी चार आयपी ॲड्रेस मिळाले आहे. त्यातील तीन आयपी ॲड्रेस हे अफगाणिस्ताने तर एक आयपी ॲड्रेस हॉगकॉगचा आहे. त्यामुळे जुबरचे पडघा गावाशी असलेले कनेक्शनही उघड झाले आहे. राष्ट्रविरोधी कृत्यात सामील असल्याच्या संशयावरून अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत गेलेल्या जुबेरला पुन्हा राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला 3 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांनी दिले आहेत. जुबेरला दि. 27 ऑक्टोबर 2025 राजी दुपाराजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला19 जुलैपर्यंत पोलिस कोठडीचे हक्क अबाधीत ठेवून पुन्हा अटक करण्यात आली आहे.
जुबेरच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून अल-कायदा- इन इंडियन सब कॉन्टीनेट मॅनीफेसीटेशन व इन्सस्पायर मॅग्झिन आढळे. त्यामध्ये गन स्कुल ट्रेनिंग विथ एके-47 बाबात वेगवेगळ्या बाबतचे फायरींगचे फोटो होते. तसेच स्फोटके तयार करण्याचे फॉर्म्यूला पुस्तकात मिळाला आहे. त्याच्या साथीदाराच्या झडतीत 12 मोबाईल, सहा लॅपटॉप एक पेनड्राइव्ह , रोख 2 लाख 35 हजार रुपये मिळून आले. जप्त करण्यात आले डाटा 1 टीबी पेक्षा जास्त आहे. त्याचे विश्र्लेषन सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.
जुबेरच्या संपर्कातील एकाने 28 ऑक्टोबर रोजी कोंढव्यातील एका सभेत संशिय पुस्तके वाटली होती. त्यानंतर ती पुस्कते व इतर काही कागदपत्रे काळेपडळ येथील मदरशाच्या जागेत जाळली. तसाप यंत्रणांनी ती जागा शोधून काढली. जुबेरने तपास यंत्रणांना जेथे त्यांचे ब्रेनवॉश केले जात असे ती जागा देखील दाखवून दिली. त्याला 2015 मध्ये अबु अनस नावाचा व्यक्तीने खिलापत व इसीसचे व्हीडीओ दाखविले होते. 2021 मध्ये तस्ए मुलांच्या फिजीकल, स्पोर्ट ॲक्टीव्हीटी कॅम्प ठाण्यातील पडघा येथे घेतले होते ते ठिकाण त्याने दाखविले आहे.
दरम्यान जुबेर व त्याचे इतर साथीदार इलेक्ट्रॉनिकक्स डिव्हायसेस विश्लेषणातून खिलाफत चे राज्य आणून शरीयत कायदा लागू करण्याच्या तयारीत होते. इसिस, अल. कायदा अशा दहशतवादी संघटनांची विचारसरणी आणण्याच्या उदे्दशाने मुस्लीम तरूणांना सभांसाठी बोलवत हाते. सुरवातीला त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी धार्मिक विचारांबाब माहिती सांगून त्यांना अधिक धार्मिकते वळवून त्यांना धार्मिक कार्यकामाच्या नावाखाली पडघा येथे एकत्रित आणून त्यांना धार्मिक कट्टरतेकडे वळवून त्यांची मानसिकता व शारीरिक चाचणी घेण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेतल्याची माहिती समोर आली आहे. जुबेरच्या संपर्कातील साथीदार व संशयीत व्यक्ती यांच्याकडे मिळून आलेल्या माहितीवरून तपास करण्यासाठी अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीयांनी यांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली.