ZP PS Election : जि. प., पंचायत समित्यांच्या गट, गणनिहाय मतदार प्रारूप याद्या जाहीर

14 ऑक्टोबरपर्यंत नोंदविता येणार हरकती अन्‌‍ सूचना
pune
गट, गणनिहाय मतदार प्रारूप याद्या जाहीर(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पुणे : जिल्हा परिषद आणि 13 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गट व गणनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर 9 ते 14 ऑक्टोबरदरम्यान संबंधित तहसील कार्यालयात सूचना आणि हरकती नोंदविता येतील. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अर्हता दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशीपर्यंत विधानसभेच्या मतदार याद्यांमध्ये नाव असणाऱ्यांना या निवडणुकीत मतदान करता येईल. त्या वेळी एका गण-गटात नेमके किती मतदार आहेत, याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली. (Latest Pune News)

जिल्ह्यातील 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यावर 13 ऑक्टोबरपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हरकती आणि सूचना दाखल करता येतील.यानंतर प्रांत अधिकारी आलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करून 28 ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करतील. नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या मतदान केंद्रांची यादी 7 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील नगरविकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली.

pune
MPSC vacancies: एमपीएससी गट ‌‘क‌’च्या 938 जागा भरणार; या तारखेपर्यंत आहे अर्ज भरण्याची संधी

अशी असेल मतदारयादी तयार करण्याची प्रक्रिया

  • गट-गणनिहाय मतदार याद्यांवरील हरकती आणि सूचना

  • 14 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारल्या जातील.

  • त्यावरील सुनावणी 26 ऑक्टोबरपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात घेण्यात येईल आणि त्या निकाली काढून निर्णय दिले जातील.

  • 27 ऑक्टोबर रोजी गट-गणनिहाय अंतिम मतदार याद्या प्रकाशित केल्या जातील. यानंतर मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर केंद्रनिहाय मतदार यादी तयार केली जाणार आहे.

pune
Accident News: भयंकर... ट्रकमधील सळया स्कूल बसमध्ये आरपार घुसल्या!

याद्या तयार करण्यादरम्यान या होतील दुरुस्त्या

गट-गण आणि प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा नावे-पत्त्‌‍यांमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यवाही राज्य निवडणूक आयोग करत नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून झालेल्या चुका, मतदाराचा प्रभाग चुकून बदलणे किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे अशा संदर्भातील दुरुस्त्यांसाठी मतदार हरकती आणि सूचना दाखल करू शकतात.

14 ऑक्टोबरपर्यंत दाखल करा हरकती, सूचना

एका गट-गणात वास्तव्यास असूनही नाव दुसऱ्या ठिकाणच्या मतदार यादीत आले असल्यास, प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 14 ऑक्टोबरपर्यंत संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे हरकत आणि सूचना दाखल करता येतील. तसेच नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय मतदार याद्यांबाबत हरकती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करता येतील. त्यावर सुनावणी होणार आह

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news