

पुणे: गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये तब्बल दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. मात्र, यंदा ही प्रक्रिया 30 मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून यासाठी विभागनिहाय बदलीयोग्य कर्मचार्यांचा डेटा संकलित करण्याचे काम सुरू असून, आगामी आठ ते दहा दिवसांत बदल्यांच्या याद्यशा जाहीर होणार आहेत.(Latest Pune News)
एकाच विभागात, कार्यालयात, तालुक्यात दहा वर्षे सेवा पूर्ण झालेले अधिकारी तसेच कर्मचारी प्रशासकीय बदलीस पात्र ठरतात. अशा 10 टक्के बदल्या केल्या जातात. तर दुसरीकडे विनंतीवरून 5 टक्के बदल्या करण्यात येतात.
दरम्यान, मागील वर्षी ऐन बदल्यांच्या काळातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. त्यामुळे पात्र असूनही अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या नव्हत्या. यंदा अशा स्वरूपाची कुठलीही अडचण नसल्याने जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयानुसार आता बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे.
पहिल्या टप्प्यात बदलीस पात्र अधिकारी, कर्मचार्यांचा विभागनिहाय डेटा संकलित करण्यात येत आहे. हे काम आठ ते दहा दिवसांत पूर्ण होईल. यानंतर लागलीच विभाग, तालुकानिहाय बदलीस पात्र अधिकारी, कर्मचार्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. हरकती आल्यानंतर यादी अंतिम करून बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मागील वर्षी निवडणुकीमुळे बदली प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा बदल्यांसाठी पात्र अधिकारी, कर्मचार्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच सामान्य प्रशासन विभागाने प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यास सुरूवात केली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कुठल्याही परिस्थितीत 31 मेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे दहा-दहा वर्षांपासून एका ठिकाणी वा तालुक्यात असलेल्यांना दुसर्या ठिकाणी जावे लागणार आहे.
बदली प्रक्रियेत विनंतीला ‘मान’ 5 टक्के
प्रशासकीय सोबतच 5 टक्के बदल्या विनंतीनुसार करण्यात येणार आहेत. काही कर्मचार्यांची दहा वर्षे सेवा झालेली नसली तरी विनंतीस ’मान’ देऊन काही बदल्या करता येतात. यासाठी संबंधितास प्रशासनाला ठोस कारण द्यावे लागते. आठ ते दहा दिवसांत यादी लागेल असे सांगण्यात येत