Yuvak Congress Potest: महावितरणच्या निषेधार्थ ‘युवक काँग्रेस’चे आंदोलन; भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे वीजचोरी प्रकरण

रास्ता पेठ महावितरण कार्यालयावर धडकले कार्यकर्ते
Yuvak Congress Potest
महावितरणच्या निषेधार्थ ‘युवक काँग्रेस’चे आंदोलन; भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे वीजचोरी प्रकरणPudhari
Published on
Updated on

पुणे: भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी महापालिकेच्या व्यायामशाळेत स्वतःचे राजकीय कार्यालय स्थापन करून गेल्या 12 वर्षांपासून बिनधास्तपणे वीजचोरी केल्याचे समोर आले आहे. महावितरणच्या अधिकृत अहवालातही कलम 135 नुसार वीजचोरी सिद्ध झाली आहे.

इतके असूनही अद्याप गुन्हा दाखल न होणे म्हणजेच भाजपसाठी महावितरणची तळमळ व गुलामगिरीचे दर्शन आहे, असा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आला. महावितरणच्या अन्यायकारक व भेदभावी वागणुकीचा निषेध करण्यासाठी महावितरणच्या रास्ता पेठ कार्यालयावर युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. (Latest Pune News)

Yuvak Congress Potest
Hirkani Bus: एसटीची ‘हिरकणी’ पुन्हा तिच्या मूळ रंगात..! जुन्या आठवणींना उजाळा मिळणार

गंभीर बाब म्हणजे, सामान्य ग्राहक वीजबिल भरू शकत नसल्यास त्याचा तात्काळ वीजपुरवठा खंडित केला जातो, पण भाजपचा माणूस असल्याने घाटे यांच्यावर कारवाई होत नाही. शहर युवक काँग्रेसने याविरोधात महावितरण कार्यालयात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर नोटीस देऊन सोडले.

या वेळी अक्षय जैन म्हणाले, भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे 12 वर्ष वीजचोरी करूनही अजून कारवाई नाही हेच भाजपच्या भ्रष्टाचाराचं आणि महावितरणच्या गुलामीचं जिवंत उदाहरण आहे. एकीकडे सामान्य माणसाचं कनेक्शन तोडतात, दुसरीकडे भाजप नेत्याला पाठीशी घालतात.

Yuvak Congress Potest
Art Diploma Admission: कला पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची संधी: चंद्रकांत पाटील

शहराध्यक्ष सौरभ अमराळे म्हणाले, 12 वर्ष वीजचोरी करून चार लाखांचं नुकसान करूनसुद्धा मोकळेपणाने फिरत आहेत, कारण भाजपसाठी कायदे वेगळे असतात. वीज चोरांवर गुन्हा दाखल न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडेल.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष उमेश पवार, सागर धाडवे, किशोर मारणे, महासचिव प्रथमेश आबनावे, सचिव आनंदकुमार दुबे, मेघश्याम धर्मावत, राज जाधव, हर्षद हांडे, अक्षय बहिरट, सद्दाम शेख, साकिब सय्यद, ऋषीकेश वीरकर, अभिजीत चव्हाण, तुषार पठारे, मतीम शेख, अनिरूद्ध जगदाळे, संकल्प कोंडेकर, रमेश सातपुते, निहाल शेख, प्रथम परिट, अजय बनसोडे, यश कोलते आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news