Yerwada Sewage Problem: येरवड्यात शाळा-चर्चसमोर सांडपाण्याचे साम्राज्य; विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पावसाळी वाहिनीत व्यावसायिक इमारतीचे सांडपाणी; दुर्गंधीने नागरिक त्रस्त, कारवाईची मागणी
Yerwada Sewage Problem
Yerwada Sewage ProblemPudhari
Published on
Updated on

येरवडा: येरवडा येथील डॉन बाॅस्को शाळा आणि चर्चसमोर असलेल्या पावसाळी वाहिनीत एका व्यावसायिक इमारतीचे सांडपाणी सांडले जात आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे ही वाहिनी तुंबून सांडपाणी रस्त्यावर वाहत असून, ते शाळेच्या आवारात आणि चर्चच्या पायऱ्यांजवळ जमा होत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येणारे नागरिक आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.

Yerwada Sewage Problem
Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरणसाखळी ‘फुल्ल’; मुठा नदीत २९ हजार क्युसेक विसर्ग, पुणेकरांना सतर्कतेचा इशारा

विद्यार्थ्यांना शाळेत येताना आणि जाताना या सांडपाण्यातून वाट काढावी लागत आहे. तसेच, रविवारी प्रार्थनेसाठी येणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाही महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

Yerwada Sewage Problem
Pune Rainwater Harvesting Tax Rebate: रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या नावाखाली पुणे मनपाला कोट्यवधींचा फटका; ३२ हजार सोसायट्यांवर संशयाची नजर

माजी नगरसेवक जॉन पॉल म्हणाले, 'चर्च आणि शाळेशेजारी असलेल्या व्यावसायिक इमारतीचे सांडपाणी थेट पावसाळी वाहिनीत सोडले जात आहे. पावसामुळे ही वाहिनी तुंबून सांडपाणी परिसरात साचून राहत असल्याने चर्चमध्ये येणारे नागरिक आणि शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. खासगी व्यावसायिकाची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही.

Yerwada Sewage Problem
Pune EV Battery Solar Exhibition 2026: पुण्यात ऑक्टोबरमध्ये रंगणार भारतातील सर्वात मोठे EV, बॅटरी आणि सौर ऊर्जा प्रदर्शन

येत्या आठ दिवसांत महापालिका प्रशासन आणि संबंधित व्यावसायिकाने ही समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.' महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करावी, तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Yerwada Sewage Problem
Maharashtra Rainfall Report: अल निनोची स्थिती असतानाही जुलैत भरपूर पाऊस? या कारणांनी बरसला धो-धो

पावसाळी वाहिनीत सोडण्यात येणार सांडपाणी थेट चर्चच्या पायऱ्यांवर आणि शाळेसमोर जमा होत आहे. प्रार्थना करताना नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित इमारतीच्या मालकावर तातडीने कारवाई करावी.

फादर मायकल डिसुजा, डॉन बोस्को चर्च, येरवडा चर्च आणि शाळेच्या परिसरात तुंबणाऱ्या सांडपाण्याची

संबंधित अधिकाऱ्यांना पाहणी करण्यास सांगितले जाईल. यात इमारतीच्या मालकाचा दोषी आढळ्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. ही समस्या लवकरात लवकर सोडवून विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.

प्रकाश वालगुडे, सहायक आयुक्त, येरवडा क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news