Yerawada Vadgaon Sheri Nominated Members: स्वीकृत सदस्यपदासाठी कार्यकर्त्यांची फिल्डिंग; येरवडा-वडगावशेरीत तीन जागांसाठी ११ इच्छुक

महापालिका निवडणुकीतील ‘आश्वासनां’ची आठवण; सामाजिक संस्थांचे कागदपत्रे जुळविण्यासाठी इच्छुकांची धावपळ
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

माऊली शिंदे

वडगाव शेरी: महापालिका निवडणुकीत मदत करा, स्वीकृत सदस्यपदासाठी तुमचा विचार केला जाईल, असे आश्वासन नगरसेवकांनी अनेक राजकीय कार्यकर्त्यांना दिले होते. आता याच आश्वासनाची आठवण करून देत कार्यकर्त्यांनी स्वीकृत सदस्यपदासाठी नगरसेवक आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

Pune Municipal Corporation
Fursungi Waste Depot Protest: फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोवरून ग्रामस्थ आक्रमक; नवीन प्रकल्पाविरोधात २० दिवसांपासून आंदोलन

येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयातील तीन स्वीकृत सदस्यांच्या जागांसाठी आतापर्यंत ११ जणांनी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे एकाला होकार दिल्यास दुसरा नाराज होण्याची शक्यता असल्याने संधी नेमकी कोणाला द्यायची, असा पेच नगरसेवकांसमोर निर्माण झाला आहे. महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार १८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत क्षेत्रीय कार्यालयात अर्ज सादर करायचे आहेत.

Pune Municipal Corporation
Junnar Crime Protest: पिंपळवंडीत चिमुरडीवरील अत्याचार-हत्येचा संताप; आरोपीला फाशीची मागणी करत मूक मोर्चा

स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुक व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नसावी. तसेच संबंधित व्यक्तीच्या संस्थेच्या माध्यमातून प्रभाग समितीच्या क्षेत्रात सामाजिक कार्य केलेले असणे आवश्यक आहे. संबंधित सामाजिक संस्थेची मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम, १९५० नुसार धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेली असावी. तसेच संस्थेचे तीन वर्षांचे लेखापरीक्षण आणि सामाजिक कार्याचे अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे सादर केलेले असणे आवश्यक आहे. अशा संस्थेच्या सदस्याची स्वीकृत सदस्यपदासाठी निवड केली जाते.

Pune Municipal Corporation
Humidity Rising Heat: वाढत्या दमट-उष्णतेचा उत्पादकतेला फटका; कामाचे तास घटल्याने अर्थव्यवस्थेवर ताण

या अटींमुळे धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेचे लेखापरीक्षण व कामकाजाचे अहवाल सादर करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे. इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेऊन लेखापरीक्षण करणाऱ्या व्यक्तींनीही कामाचे दर वाढविल्याची चर्चा आहे. अनेक इच्छुकांकडे स्वतःची सामाजिक संस्था नसल्याने ते अशा संस्थेच्या शोधात आहेत. ज्या सामाजिक संस्थांचे लेखापरीक्षण तसेच अन्य आवश्यक कागदपत्रे पूर्ण आहेत, अशा संस्थांनी आपल्याला सदस्य करून घ्यावे, यासाठी काही कार्यकर्ते संस्थांना मोठी देणगी देण्याचे आश्वासन देत असल्याचेही समोर येत आहे. सामाजिक कार्याचे जुने फोटो, कागदपत्रे आणि दाखले मिळवण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. याबाबत येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रकाश वालघुडे यांनी सांगितले की, आतापर्यंत ११ जणांनी स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज घेतले आहेत.

Pune Municipal Corporation
Pune Road Accidents: पुण्यात अपघातांचा कहर; साडेपाच वर्षांत १,७७६ जणांचा बळी!

भाजपचे बहुमत; तीन जागांसाठी चुरस

येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येरवडा, वडगावशेरी आणि खराडी हे तीन प्रभाग येतात. या तीन प्रभागांतून प्रत्येकी एक, अशा एकूण तीन स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत भाजपचे आठ, तर काँग्रेसचे चार नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपचे स्पष्ट बहुमत असून, स्वीकृत सदस्यपद मिळवण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांच्या पाठिंब्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news