पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह एसी दुरुस्तीसाठी बंद

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह एसी दुरुस्तीसाठी बंद
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह एसी यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी गुरुवारपासून (दि. 6) बंद करण्यात आले. दुरुस्तीचे काम 15 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. नाट्यगृह महिनाभर बंद राहणार आहे. महापालिकेच्या नाट्यगृहातील समस्या नव्या नाहीत. पण, सध्या पालिकेच्या 14 नाट्यगृहांमध्ये टप्प्याटप्प्याने दुरुस्तीचे काम केले जात आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह एसी यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी बंद केले असून, नवीन एसी यंत्रणा नाट्यगृहात बसविण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले असून, या काळात नाट्यगृहात बुकिंग झालेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोगही रद्द केले आहेत. नवीन एसी यंत्रणा नाट्यगृहात बसविली जात असल्याने कलाकारही आनंदी आहेत.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे व्यवस्थापक हनुमंत लोणकर म्हणाले की, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरुस्तीचे काम सुरू झाले असून, नाट्यगृहात एसीची नवीन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ते काम ऑगस्टपर्यंत चालणार असून, साधारणपणे महिनाभर नाट्यगृह बंद राहणार आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह 6 जुलै रोजी एसी यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी बंद केले असून, एसी यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर व्हावे, याचे प्रयत्न असणार आहेत.

सुप्रिया हेंद्रे, व्यवस्थापिका, बालगंधर्व रंगमंदिर

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news