World Eye Donation Day: नेत्रदानाचे साकडे, तिमिरातुनी तेजाकडे!

जनजागृतीचा अभाव आणि नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज यामुळे नेत्रदानाचा टक्का झपाट्याने वाढत नसल्याचे दिसत आहे.
World Eye Donation Day
नेत्रदानाचे साकडे, तिमिरातुनी तेजाकडे!Pudhari
Published on
Updated on

पुणे: नेत्रदानाचा अर्ज भरणार्‍यांची संख्या समाधानकारक असली, तरी प्रत्यारोपणाचे प्रमाण असमाधानकारक आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत यावर्षी 1270 डोळ्यांचे (बुबुळांचे) संकलन केले. 704 किरॅटोप्लास्टी (प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया पार पडल्या. जनजागृतीचा अभाव आणि नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज यामुळे नेत्रदानाचा टक्का झपाट्याने वाढत नसल्याचे दिसत आहे.

‘राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या समिती’कडून मिळालेल्या माहितीनुसार, डोळ्यांच्या संकलनाचे उद्दिष्ट गाठण्यात 100 टक्के यश आले आहे. शहरात दररोज अंदाजे 60 ते 80 लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी आठवड्यातून एखाद्या व्यक्तीचे नेत्रदान झाल्याचे दिसून येते. नेत्रदान वाढवण्यासाठी शासन, नेत्रपेढ्या आणि खासगी रुग्णालये यांच्याकडून एकत्रित पावले उचलल्यास नेत्रदानाचा टक्का वाढू शकतो. (Latest Pune News)

World Eye Donation Day
Pune: ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे विश्वस्त मंडळ बरखास्त करा; धर्मादाय न्यायालयात याचिका दाखल

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्या दर वर्षी 25,000 रुग्णांना कोर्नियाची आवश्यकता असते, मात्र उपलब्धता मर्यादित असते. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन नेत्रदानासाठी नोंदणी करणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी रुग्णालये, नातेवाईक, डॉक्टर, नेत्रपेढ्या यांच्यामध्ये समन्वय निर्माण व्हावा लागेल.

व्यक्तीला ब्रेनडेड घोषित केल्यावर अवयवदानासाठी नातेवाईकांचे समुपदेशन केले जाते. तशाच पद्धतीची प्रक्रिया नेत्रदानाबाबत राबवली जाणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अंधत्व येण्याची कारणे

अंधत्व येण्यामागे द़ृष्टीदोष, काचबिंदू, बुबुळांचे आजार, मोतिबिंदू, मागील पडद्याचे आजार कारणीभूत असतात. बुबुळाच्या आजारामुळे येणारे अंधत्व मुख्यतः कॉर्निअल अल्सर, डोळ्याला होणार्‍या इजा, ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव, केमिकल बर्न्स, अनुवंशिकतेमुळे होणारे बुबुळाचे आजार, शस्त्रक्रियेनंतर बुबुळाला येणारी सूज आदी कारणामुळे होते. या सर्व कारणांमुळे येणार्‍या अंधत्वावर बुबुळरोपण शस्त्रक्रिया हा एक आशेचा किरण आहे.

नेत्रदान कोणी करावे?

मरणोत्तर नेत्रदानास वयाची अट नाही. नेत्रदान कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, पंथाच्या व्यक्तीला करता येते. कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात. मोतिबिंदू, काचबिंदुच्या शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांनाही नेत्रदान करता येते. नेत्रदानाची शस्त्रक्रिया केलेले रुग्णही मरणोत्तर नेत्रदान करू शकतात. नेत्रदानासाठी कोणताही आर्थिक खर्च नसतो आणि ते मृत्यूनंतरच केले जाते. अर्ज भरताना कुटुंबियांची संमती आवश्यक असते.

World Eye Donation Day
Pune News| लोकअदालतीचा ‘पुणे पॅटर्न’ राज्यभर राबविणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नेत्रदान करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी

मरणोत्तर नेत्रदान सहा तासांच्या आत करावयास हवे, त्यासाठी त्वरित नेत्रपेढीशी संपर्क साधावा. नेत्रदात्याच्या खोलीतील पंखे बंद करावेत. डोळ्यामध्ये (अँटिबायोटिक्स) औषध घालावे अथवा पाण्याची पट्टी ठेवावी. जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधावा. पुणे शहरात ससून सर्वोपचार रुग्णालयाबरोबरच अन्य 11 नेत्रपेढ्या आहेत. नेत्ररोपण शस्त्रक्रिया (किरॅटोप्लास्टी) ससून रुग्णालयाच्या नेत्र विभागात मोफत केली जाते.

रुग्णाकडून डोळ्यांचे संकलन केल्यानंतर ते 48 तास ते 10 दिवस जतन करता येतात. यादरम्यान, कॉर्निया प्रत्यारोपणासाठी वापरता येतो. कॉर्नियामधील सेल काऊंट कमी असेल तर प्रत्यारोपणात यश मिळत नाही. त्यामुळे संकलन, जतन आणि प्रत्यारोपण हे तिन्ही टप्पे अत्यंत आवश्यक आहेत.

- डॉ. राजेश पवार, नेत्ररोगतज्ज्ञ

नेत्रदानाचा अर्ज प्रत्येकाने भरला पाहिजे. नेत्रपेढ्यांमध्ये, तसेच संकेतस्थळांवर अर्ज उपलब्ध आहे. अर्ज भरलेला नसला तरीही नातेवाईक मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात. पूर्वी प्रत्यारोपणात यश मिळण्याचा टक्का कमी होता. मात्र, आता बुबुळाचे सूक्ष्म भागही वापरले जातात. त्यामुळे सक्सेस रेट 70-80 टक्के झाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवीन उपकरणांची उपलब्धता, तज्ज्ञ डॉक्टर यामुळे प्रत्यारोपणाचे प्रमाण आणि यशस्विता वाढली आहे.

- डॉ. संजय पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news