World Emoji Day: इमोजींच्या दुनियेत ‘एआय’ची एंट्री;तरुणाईत एआयद्वारे केलेल्या इमोजींची क्रेझ

हसणारे, रडणारे, रागावणारे इमोजी काही सेकंदांत होताहेत तयार
World Emoji Day
World Emoji DayPudhari
Published on
Updated on

पुणे: मी आनंदी आहे, मला राग आला आहे आणि मी भावूक आहे या मनाताली भावना सांगण्यासाठी पूर्वी शब्दांची गरज पडायची. पण, गेल्या काही वर्षांत शब्दांची जागा इमोजीने घेतली अन्‌ तरुणाईमध्ये इमोजींची क्रेझ वाढली.

आता इमोजीच्या दुनियेत कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) एंट्री केली आहे. पूर्वी मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या ठराविक इमोजी वापरले जात होते.

आता मात्र एआयच्या मदतीने प्रत्येक जण हसणारे, रडणारे, आश्चर्य व्यक्त करणारे किंवा वेगवेगळ्या भावना दाखवणारे इमोजी काही क्षणांत तयार करून घेत असून, एआय इमोजींची तरुणाईत मोठी क्रेझ निर्माण झाली आहे.

शुक्रवारी (दि. १७) असलेल्या जागतिक इमोजी दिनानिमित्त दै. पुढारीने याविषयी आढावा घेतल्यावर एआय इमोजी हा सध्याच्या डिजिटल संवादातील एक नवीन आणि वेगाने वाढणारा ट्रेंड असल्याचे दिसून आले.

World Emoji Day
Sugar Price Hike: साखरेच्या दराला तेजीची उसळी; क्विंटलला ४६०० ते ४६५० रुपये दर

आजची तरुण पिढी दिवसांतून अनेक वेळा व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, टेलिग्राम किंवा एक्स (ट्विटर) यांसारख्या माध्यमांवर संवाद साधते. या संवादात शब्दांपेक्षा इमोजी अधिक वापरले जातात.

आता एआयच्या मदतीने तरुण-तरुणींना ठरलेल्या इमोजींऐवजी त्यांच्या कल्पनेनुसार आणि सद्यस्थितीनुसार अगदी हुबेहूब इमोजी तयार करता येत आहेत. तरुण-तरुणी एआयला काही सूचना देतात. त्यानंतर काही सेकंदांत त्यांना त्यांच्या मनातील भावनांवर आधारित इमोजी किंवा स्टिकर्स तयार करून मिळत आहेत.

विशेष म्हणजे, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा एखाद्या प्रसंगावर प्रतिक्रिया देण्यासाठीही अनेक तरुण आता एआयद्वारे तयार केलेली इमोजी वापरत आहेत. इन्स्टाग्राम रील्स, युट्यूब शॉर्ट्स आणि व्हॉट्सॲप स्टेटसवरही एआय इमोजींचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

अनेक कंटेंट क्रिएटर्स आपल्या व्हिडीओंमध्ये स्वतःचे कार्टून इमोजी वापरत आहेत. शब्दांबरोबरच आता एआयने तयार केलेले इमोजीही भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहेत. हसणे, रडणे, आश्चर्य व्यक्त करणे किंवा आनंद साजरा करणे... प्रत्येक भावनेला आता एआयचा नवा चेहरा मिळाला असून, हीच तरुणाईची नवी डिजिटल भाषा ठरत आहे.

World Emoji Day
Pandit Yadavraj Phad: वारकरी संगीत ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची अमूल्य देणगी- ज्येष्ठ गायक पंडित यादवराज फड

याविषयी नोकरदार तरुण राज देशमुख म्हणाला, एआयमुळे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आवडीनुसार इमोजी तयार करता येत आहेत. आपल्या मनातील भावनांवर आधारित इमोजीही तयार करून मिळत असून, प्रत्येक इमोजी वेगळा आणि खास दिसतो. त्यामुळे आम्हा तरुणाईत या नव्या तंत्रज्ञानाचे विशेष आकर्षण आहे. मीही संवाद साधताना अशा इमोजींचा वापर करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news