पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षी होणार्या छत्रपती श्रीशिवाजी महाराज जन्मोत्सव हिंदवी स्वराज्य (महादुर्ग) महोत्सव राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. ही समिती कायमस्वरूपी असणार आहे. त्यानुसार या समितीचे अध्यक्ष तथा नोडल अधिकारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असणार आहेत. याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी सनि यंत्रण समितीदेखील गठित करण्यात आली आहे. दरम्यान, यावर्षी होणार्या कार्यक्रमासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचा जन्म झाला.
त्यानिमित्त दरवर्षी महाराजांची जयंती उत्साहात शासनाच्या वतीने साजरी करण्यात येते. आता मात्र शासनाने या जन्मोत्सवासाठी कायमस्वरूपी समिती स्थापन केली आहे. याबरोबरच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी सनियंत्रण समिती गठित केली आहे. महोत्सव आयोजन समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असून, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक विधीमहामंडळ सदस्य, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, अधीक्षक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, मुंबई, सांस्कृतिक कार्य संचनालय, (मुंबई), सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, पुणे, उपविभागीय पोलिस अधिकारी, जुन्नर, वीज कंपनी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता, जुन्नर नगरपालिका मुख्य अधिकारी, राज्य पुरातत्व विभाग, पुणे सहायक संचालक, उपविभागीय अधिकारी जुन्नर, हे सर्व सदस्य असणार असून, विभागीय पर्यटन संचनालय, पुणे उपसंचालक या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. अशीच सनियंत्रण समिती पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे.
हेही वाचा