

पुणेः औंध आणि बाणेर परिसरात कामगार महिलांनीच ऐवजावर चोरी केल्याचे प्रकार समोर आले आहेत, एका बुटिक तसेच कपड्यांचे दुकानातून दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तर बाणेरमध्ये एका सदनिकेच्या बेडरूममधील १ लाख ८० हजारांचे दागिने दोन कामगार महिलांनी चोरले आहेत.
याप्रकरणी पहिल्या घटनेत चतु:शृंगी पोलिस ठाण्यात ४८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी एका अनोळखी महिलेच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १ एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला आहे. फिर्यादी यांचे आनंद पार्क येथील आशिष रेसिडेन्सी येथे एक बुटिक आणि कपड्यांचे दुकान आहे. त्याठिकाणी महिला कामगार होती. तिने आठ महिन्यात वेळोवेळी साड्या, बुटिकचे साहित्य असे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
तर दुसरी घटना बालेवाडीमधील हायस्ट्रीट रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन महिलांवर गुन्हा नोंद केला आहे. फिर्यादी येथील आशिया हाऊसमध्ये राहण्यास आहेत. त्यांच्याकडे दोन महिला कामगार घरकामासाठी आहेत. दरम्यान, फिर्यादींची नजर चुकवून महिलांनी बेडरूममधील कपाटातून १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. अधिक तपास पोलिस करत आहेत.