

पुणे : महिला फक्त घरापुरती मर्यादित नाही, तर ती उद्योग, व्यवसाय आणि समाज उभारणीतही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. महिला उद्योजकांची संख्या अशीच दिवसेंदिवस वाढवत आहे हे आज या कार्यक्रमासाठी आलेल्या महिला उद्योजकांकडे पाहून समजते. ती आणखी वाढत राहिली पाहजे, असे मत उद्योजक इंद्रनील चितळे यांनी व्यक्त केली.(Latest Pune News)
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवात महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त भरत अग्रवाल, डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्येने महिला उद्योजिका उपस्थित होत्या. महिलांचा सन्मान करण्यात आला.
भरत अग्रवाल म्हणाले, नवरात्री उत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात. यामध्येच समाजातील विविध स्तरावरील महिला व मुलींचा सन्मान केला जातो व त्यांना प्रोत्साहन दिले जाते.