

पुणे : आनंद नगर सनसिटी रोड येथे श्री महालक्ष्मी मंदिर आहे या मंदिरात महालक्ष्मीची सुंदर आणि रेखीव मूर्तीची स्थापना केली आहे. नवरात्रीनिमित्त महालक्ष्मीच्या दर्शनाला नागरिकांची गर्दी वाढत चालली आहे. ट्रस्टचे नवरात्र उत्सवाचे निखिल बाणखेले हे संस्थापक अध्यक्ष आहेत.
या नवरात्री उत्सवाचे हे पंधरावे वर्ष आहे. घटस्थापनेपासून सुरू झालेला हा उत्सव कोजागिरी पौर्णिमापर्यंत अखंड सुरू असतो. ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग लहान मुले, आणि तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने येथील गरबा, दांडिया खेळण्यासाठी मोठ्या संख्येने जमा होतात. या उत्सवाला कार्यकर्ते आणि माता भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.