पुणे : डॉक्टरकडून क्लिनिकमध्ये महिलेवर बलात्कार

पुणे : डॉक्टरकडून क्लिनिकमध्ये महिलेवर बलात्कार
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मांगडेवाडी येथील एका क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आलेल्या महिलेवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याचा तसेच नंतर तिचा वारंवार पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. अमित आनंदराव दबडे (रा. आंबेगाव खुर्द, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात डॉक्टर विरोधात फिर्याद दिली आहे. 1 जुलै 2022 नंतर हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर अमित दबडे याचे कात्रज परिसरात मांगडेवाडी या ठिकाणी कल्पनानंद क्लिनिक आहे. या क्लिनिकमध्ये तपासणी करण्याकरिता पीडित महिला आल्यानंतर, त्याची तिच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर डॉक्टरने महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मोबाईल फोनवर मेसेज आणि कॉल करून तिच्याशी गोड बोलून त्याच्या हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. या वेळी इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, तिचा वारंवार पाठलाग करून तिला डॉक्टरने त्रास दिला. याबाबत महिलेने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक एस. तावडे तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news