Pune News
45 दिवसांचा संसार; विवाहितेला मिळणार 45 लाखPudhari File Photo

Pune News: 45 दिवसांचा संसार; विवाहितेला मिळणार 45 लाख; पतीसह सासू, सासरे- नणंदेविरोधातील दाखल गुन्हेही मागे

पतीसह सासू, सासरे व नणंदेविरोधातील दाखल गुन्हेही मागे
Published on

पुणे: पसंत तसेच हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून नववधूस 45 दिवसांत घराबाहेर काढणाऱ्या सासरच्यांनी सुनेस एकरकमी 45 लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शविली. पत्नीनेही सासरच्यांविरोधातील कौटुंबिक हिंसाचारानुसार दाखल केलेले गुन्हे मागे घेतले. त्यानंतर, दाम्पत्यांनी परस्पर संमतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला अन्‌‍ कौटुंबिक हिंसाचारासह घटस्फोटाचा दावा अवघ्या एक वर्षात निकाली निघाला.

माधव आणि माधवी (दोघांची नावे बदलेली आहेत) यांचा विवाह 29 जानेवारी 2022 रोजी झाला. लग्नाच्या काही दिवसांनंतर लग्नात हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून सासू, सासरा व नणंदेकडून विवाहितेचा छळ सुरू झाला. (Latest Pune News)

Pune News
Railway crowd control active mode: रेल्वेची गर्दी नियंत्रण यंत्रणा ‌’ॲक्टिव्ह मोड‌’वर! प्रवाशांना थांबण्यासाठी विशेष मंडपाची व्यवस्था

यादरम्यान, माधव यानेही ‌‘तू मला पसंत नव्हतीस, मला लग्न करायचे नव्हते, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून मी लग्न केले,‌’ असे बोलून तिचा मानसिक छळ सुरू केला. त्यानंतर आरोपींनी विवाहितेस घराबाहेर काढले. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी ती परत नांदण्यास आली असता तिला घरात घेतले नाही.

माधव यानेही फोन घेणे व भेटण्यास टाळले. यादरम्यान, सासऱ्यांनी संपर्क साधत मुलाला दुसरे लग्न करायचे आहे, तुला नांदवायचे नाही, तू घटस्फोट दे म्हणून मानसिक त्रास दिला. याप्रकरणी, तिने भोसरी पोलिस ठाण्यात सासरच्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

Pune News
Mula Mutha Development: मुळा-मुठा नदीकाठ सुशोभीकरणाला गती; 22 हेक्टर जागांचे भूसंपादन मंजूर

तपासानंतर, आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात, पत्नीतर्फे ॲड. प्रियंका काटकर आणि ॲड. रेश्मा सोनार यांनी काम पाहिले. समुपदेशादरम्यान पतीने एकरकमी 45 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यास पत्नीनेही होकार दर्शवित कौटुंबिक हिंसाचारानुसार दाखल गुन्हा मागे घेण्याची तयारी दर्शविली. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. तो न्यायालयाने मंजूर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news