बारामतीत सर्वदूर पावसाची हजेरी

बारामतीत सर्वदूर पावसाची हजेरी

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  प्रदीर्घ विश्रांतीनंतर बारामती शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात शनिवारी (दि. 24) पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी बारामती शहर व परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता. शनिवारी सकाळपासूनच वातावरण बदलले होते. दुपारपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. डोर्लेवाडी, मळद, झारगडवाडी, गुणवडी या भागांसह शहराला पावसाने झोडपून काढले.

शहरात यापूर्वी दोनदा मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. परंतु, ग्रामीण भाग मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होता. शनिवारी पावसाने सुरुवात करीत पहिल्याच दिवशी समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, या पावसामुळे खरिपातील पेरण्या आता वेग घेण्याची चिन्हे आहेत. पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या यंदा खोळंबल्या होत्या. संतांच्या पंढरीच्या दिशेने जाणार्‍या पालख्या आल्या आणि पुढे निघून गेल्या. परंतु, पावसाने फिरविलेली पाठ कायम होती. शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news