सुसाट टँकरचालकांवर नियंत्रण कुणाचे? : वाघोलीतील नागरिकांचा सवाल

सुसाट टँकरचालकांवर नियंत्रण कुणाचे? : वाघोलीतील नागरिकांचा सवाल
Published on
Updated on

वाघोली : पुढारी वृत्तसेवा : वाघोलीसह परिसरात पाणीटंचाई जाणवत असल्याने टँकरमाफियांचे सोन्याचे दिवस आले आहेत. त्यामुळे कमी वेळात टँकरच्या जास्तीत जास्त फेर्‍या करण्यासाठी त्यांची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या रस्त्यांवर टँकरचालक सुसाट वेगाने धावत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारतात येत नाही. अशा टँकरचालकांवर वाहतूक शाखेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह पालकांमधून होत आहे. वाघोली-डोमखेल रोडवर रायसोनी इंजिनिअरिंग महाविद्यालय, वाघेश्वर इंग्लिश स्कूल, उद्यान, हॉस्पिटल आणि अंगणवाडी आहे. डोमखेलकडून येणारे-जाणारे पाण्याचे टँकर भरधाव वेगाने येतात.

वाघेश्वर इंग्लिश स्कूल, हॉस्पिटल, गार्डन, अंगणवाडी अगदी रस्त्याला लागून आहेत. या रस्त्यावर तीन तीव्र वळणे आहेत. टँकरचालक वळणावरसुद्धा वेग कमी करीत नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची तारांबळ उडत आहे. यामुळे दुर्घटना होण्याची शक्यात नाकारता येत नाही. सुसाट टँकरचालकांवर कुणाचे नियंत्रण आहे की नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होते आहे. रस्ता अरुंद असताना भरीसभर म्हणून काही चालक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने लावतात.

काहींनी तर सीमा ओलांडत दूध व्यवसायासाठी कायमस्वरूपी एक मोठा लोखंडी कंटेनर लावून अतिक्रमणच केले आहे. त्यामुळे दुधाची वाहने रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. अरुंद रस्ता आणि अतिक्रमणांमुळे शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. मुलगा घरी येईपर्यंत पालक चिंतेत असतात. डोमखेलकडे जाणार्‍या दोन्ही रस्त्यावर आणि बाजारतळाच्या मागील बाजूस गतिरोधक बसवण्यात यावेत, रस्त्याच्या बाजूला लावण्यात येणार्‍या वाहनांसह टँकरचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

वाघोली परिसरातील रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांची लवकरच पाहणी करण्यात येईल. त्यानंतर त्यावर कारवाई केली जाईल.

– कुणाल मुंढे,

सहायक निरीक्षक, अतिक्रमण निर्मूलन विभाग, नगर रोडवर क्षेत्रीय कार्यालय परिसरात सुसाट वेगाने टँकर चालवणार्‍या चालकांवर लवकरच करावी केली जाईल. तसेच, रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍यांवर कारवाई केली जाईल.

– गजानन जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, लोणीकंद

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news