काळजी घ्या! पॅरासिटॅमॉल डोसमध्ये वयानुसार बदल

काळजी घ्या! पॅरासिटॅमॉल डोसमध्ये वयानुसार बदल
पुणे : पुढारी वृत्तसेवा : लहान मुलांना लसीकरणानंतर ताप आल्यावरच गोळ्यांऐवजी वयानुसार पॅरासिटॅमॉलचा डोस सिरपच्या स्वरुपात द्यावा, अशा सूचना औंध जिल्हा रुग्णालयातर्फे देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार याबाबतचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. रपॅरासिटॅमॉलचा डोस वयानुसार आणि गरजेनुसार दिल्यास तापाचे प्रभावी व्यवस्थापन करता येईल आणि लसीकरणाचे प्रमाण वाढू शकेल, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
लसीकरणानंतर पॅरासिटॅमॉल कधी आणि कशा स्वरूपात द्यावे, याबाबतच्या विशिष्ट मार्गदर्शक सूचना यापूर्वी उपलब्ध नव्हत्या. याबाबत केंद्र शासनाने सूचना पाठवल्या असून, वैद्यकीय अधिकारी आणि लसीकरण कर्मचार्‍यांनी त्याची अंमलबजावणी करावी, असे नमूद करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात पॅरासिटॅमॉलचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठीही तयारी करण्यात आली आहे.

असा द्यावा डोस

वयोगट                                   डोस
  • 6 आठवडे ते 6 महिने         2.5 एमएल
  • 6 ते 24 महिने                      5 एमएल
  • 2 ते 4 वर्षे                         7.5 एमएल
  • 4 ते 6 वर्षे                          10 एमएल

काय काळजी घ्यावी ?

लसीकरणानंतर ताप आल्यास आणि 4 ते 6 तासांपर्यंत कायम राहिल्यासच डोस द्यावा. 2 किलोग्रॅमहून कमी वजन असणार्‍या बाळांना डोस देऊ नये. ताप खूप कालावधीपर्यंत कायम राहिल्यास 24 तासांमध्ये जास्तीत जास्त 4 वेळा डोस देता येईल. दोन डोसमध्ये चार तासांचे अंतर असावे.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news