बीड : पुरवठा विभागातील कोतवाल २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला

ला ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
ला ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

गौतम बचुटे/केज (बीड) पुरवठा विभागात काम करणारा कोतवाल हा त्याच्या 'साहेबांसाठी' स्वस्त धान्य दुकानदारांकडून २० हजार रुपयांची लाच घेत असताना रंगेहाथ पकडला गेला आहे. या प्रकरणी तहसीलदारांसह कोतवालावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. बीड जिल्हा हा आता भ्रष्टाचाराचे कुरण म्हणूनही बदनाम होत आहे.

केज तहसील कार्यालयाचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी काही दिवसांपूर्वी केज तालुका आणि शहरातील स्वस्त धान्य दुकानांना भेटी दिल्या होत्या. यावेळी त्यांना स्वस्त धान्य दुकानाच्या दुकानदारांना मिळालेला स्वस्त धान्याचा कोटा व वाटप यात तफावत आणि अनियमितता निदर्शनास आली होती.

दरम्यान त्यांनी स्वस्त धान्य दुकानावरील कारवाई टाळण्यासाठी तक्रारदार यांचे स्वस्तधान्य दुकानावर कारवाई न करण्यासाठी तसेच त्या दुकानाचा परवाना रद्द न करण्या करीता तहसिलदार अभिजीत जगताप यांनी पुरवठा विभागातील चतुर्थश्रेणी कोतवाल मच्छिंद्र माने याच्या मार्फत तक्रारदार यांच्याकडे ४० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.

दरम्यान दि. ३१ मे रोजी पुरवठा विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कोतवाल मच्छिंद्र माने याने तडजोडी अंती २० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करुन पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडून केज अंबाजोगाई रोडवरील उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळ असलेल्या एका हॉटेल जवळ २० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना धाराशिव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोतवाल मच्छिंद्र माने यास ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपी तहसीलदार अभिजीत जगताप फरार झाला आहे.

या कारवाईत धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे, संभाजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्यासह पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे नागेश शेरकर, वाहन चालक दत्तात्रय करडे यांनी कारवाईत भाग घेतला.

लाचलुचपत प्रतिविभाग पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम मेहेत्रे यांच्या तक्रारीनुसार केज पोलिस ठाण्यात आरोपी तहसीलदार अभिजीत जगताप आणि २० हजार रुची लाच घेताना रंगेहाथ पकडलेला आरोपी कोतवाल मच्छिंद्र माने यांच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news