

बेलसर : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्याची जीवनवाहिनी असणार्या पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्राच्या बाहेर छुप्या पद्धतीने जलवाहिनी जोडून पाण्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती शेतकर्यांकडून देण्यात आली आहे. योजनेच्या लाभक्षेत्रातील पारगाव मेमाणेच्या भगतवस्तीवरील शेतकर्यांनी वेळोवेळी अधिकार्यांना तोंडी मागणी करूनही पाणीपुरवठा केला जात नाही, तर अधिकारी निवेदन घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे नक्की पुरंदर उपशाच्या पाण्यात कुठे घोळ आहे हे शेतकर्यांना कळायला मार्ग नाही.
पुरंदर उपसा सिंचन योजनेचे अधिकारी हे वैयक्तिक लाभासाठी लाभक्षेत्राच्या बाहेर दुसर्या गावाला जलवाहिनी जोडून देत असल्याचा आरोप दिवे लाइन मायनर चारच्या लाभार्थी शेतकर्यांनी केला आहे. या जोडणीवर कारवाई करावी, अशी मागणीही शेतकर्यांकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्ष परिस्थिती पाहता लाभक्षेत्रातच पाणी कमी पडत आहे व त्यामुळे आजची चालू पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत.
लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी नेण्याचा प्रयत्न केला होता, पण आम्ही पाणी दिले नाही. मायनर चारला पाणी सोडले आहे. पाणी बाहेर गेले आहे, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही.
नीलेश लगड, शाखा अभियंता, पुरंदर उपसा सिंचन योजनादिवे लाइन जास्त चालत नसल्यामुळे व पंप सतत नादुरुस्त असल्याने लाभक्षेत्रातच आम्हाला मागणीच्या फक्त 20 टक्के पाणी मिळत आहे. अशी परिस्थिती असताना काही लोक वैयक्तिक लाभासाठी राजकीय दबाव आणून मनगटशाहीच्या जोरावर लाभक्षेत्राच्या बाहेर दुसर्या गावाला लाइन जोडून देण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिकार्यांनी जोडून देऊ नका, असे सांगूनदेखील मकोण अधिकारी त्याला काय कळतं, अशी अरेरावीची भाषा वापरली जात आहे.
-राजेंद्र निंबाळकर, शेतकरी, भगतवस्ती, पारगाव मेमाणे
हे ही वाचा :