Inter University girls hockey tournament: महर्षी दयानंद, गोंडवाना विद्यापीठाची विजयी सलामी

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलींच्या हॉकी स्पर्धेत दणदणीत विजय
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संघाचे खेळाडू चेंडूवर ताबा मिळविताना.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संघाचे खेळाडू चेंडूवर ताबा मिळविताना.Pudhari
Published on
Updated on

पुणे : पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलींच्या हॉकी स्पर्धेत महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ अजमेर, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि महाराज कृष्णकुमार सिंहजी भावनगर गुजरात या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा सहज पराभव करून विजयी सलामी दिली.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संघाचे खेळाडू चेंडूवर ताबा मिळविताना.
Pune Mumbai Missing Link: पुणे–मुंबई मिसिंग लिंक मे पासून वाहतुकीसाठी खुला होणार

महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ अजमेर संघाने व्हिएनएस गुजरात युनिव्हर्सिटी संघाचा ७-० असा सहज पराभव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संघाने युनिव्हर्सिटी ऑफ कोटा संघाचा ८-० असा धुव्वा उडविला. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संघाने महाराज सुरजमल ब्रीज विद्यापीठ भरतपूर संघाचा १३-० असा एकतर्फी पराभव केला.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संघाचे खेळाडू चेंडूवर ताबा मिळविताना.
CET Cell Recruitment: सीईटी सेलकडून ४० जिल्हा संपर्क अधिकारी नेमणार

महाराज कृष्णकुमार सिंहजी भावनगर गुजरात संघाने मोहनलाल सुखाडीया विद्यापीठ उदयपूर संघाचा २०-० असा धुव्वा उडविला. सामन्यात प्राची शहाने सर्वाधिक आठ गोल नोंदविले. संत घाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संघाने गायत्री अंबोरे आणि भैरवी मोहुर्ले यांनी केलेल्या गोलांमुळे बराकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ संघाचा २-१ असा सहज पराभव केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news