पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात अजून दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस बरसणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भ या भागात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यात तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश भागांत अवकाळी पाऊस बरसणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांतही पाऊस होईल. मात्र, शनिवारपासून पाऊस कमी होईल, असा अंदाज आहे.
हेही वाचा