Weather Update : नव्या वर्षाची पहाट होणार कडाक्याच्या थंडीने

Weather Update : नव्या वर्षाची पहाट होणार कडाक्याच्या थंडीने

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पश्चिमी चक्रवात सक्रिय राहणार असल्याने नवे वर्ष कडाक्याची थंडी घेऊन येत आहे. दरम्यान, सोमवारी जळगावचा पारा राज्यात सर्वांत नीचांकी (9.6 अंश) ठरला, तर गोंदिया (10.5 अंश), पुणे (11.7 अंश) गारठले होते. जम्मू कश्मीरपासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश बिहार, मध्य प्रदेशपर्यंतची राज्ये गारठली असून त्या भागात दाट धुक्याने दृष्यमानता कमी झाली आहे. त्या भागात पश्चिमी चक्रवात 2 जानेवारीपर्यंत सक्रिय राहणार असल्याने नवे वर्ष 2024 चा पहाटेच्या थंडीनेच उगवणार आहे.

सोमवारचे राज्याचे किमान तापमान

जळगाव 9.6, गोंदिया 10.5, पुणे 11.7, कोल्हापूर 16.4, महाबळेश्वर 14.9, मालेगाव 13.2, नाशिक 12.5, सांगली 15, सातारा 13.8, सोलापूर 16.4, धाराशिव 16.2, छत्रपती संभाजीनगर 12.1, परभणी 13.4, नांदेड 13.8, बीड 12.5, अकोला 12.5, अमरावती 13.3, बुलडाणा 13.8, चंद्रपूर 11.4, नागपूर 13.7, वाशिम 11.6, वर्धा 14. जळगाव 9.6, गोंदिया 10.5, पुणे 11.7 अंशावर; नवे वर्ष थंडी घेऊन येणार.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news