पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'रेमल' चक्रीवादळामुळे मान्सूनची पूर्वेकडील (बंगालच्या उपसागराकडील) दुसरी शाखा सक्रिय झाली आहे. सध्या केरळकडील पहिल्या शाखेची गती किंचित मंदावली आहे. रविवारी या महाचक्रीवादळाचा वेग ताशी 130 किमीवर गेला होता. हे वादळ पश्चिम बंगालची किनारपट्टी पार करून सोमवारी बांंगलादेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचा महाष्ट्रावर परिणाम होणार नसल्याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'रेमल' महाचक्रीवादळाचा वेग 130 किमीपेक्षा पुढे गेला असून, रविवारी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या जवळून ते सोमवारी 27 रोजी ते बांगलादेशकडे जाईल. दरम्यान, या स्थितीमुळे मान्सूनची दुसरी शाखा सक्रिय झाली असून, तो नैर्ऋत्य बंगालच्या उपसागराच्या मध्यावर पोहोचला. त्यामुळे यंदाही तो केरळऐवजी बंगालच्या उपसागराच्या शाखेने राज्यात येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र याचा अंदाज चक्रीवादळ शांत झाल्यावरच अधिक स्पष्टपणे देता येईल.
हेही वाचा