

पुणे : यंदा नोव्हेंबर थंडीविनाच संपला. आगामी तीन महिन्यांत म्हणजे डिसेंबर ते फेब—ुवारी या कालावधीत देशातील किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशातील बहुतेक भागांमध्ये अपेक्षित तापमानापेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य भारतासह उत्तरेतील काही भागात तापमान वाढीची शक्यता आहे. यंदाच्या मान्सून हंगामातही देशातील अनेक भागांत तापमान सामान्यपेक्षा जास्त होते.
देशात उत्तर ते मध्य भारतात 69 टक्के, तर दक्षिण भारतात 131 टक्के पावसाचे प्रमाण राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अल निनो सध्या प्रबळ असून, प्रशांत महासागरासह हिंदी महासागरातील तापमान बदलाचा हा प्रभाव असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
आग्नेय आणि लगतच्या र्नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे तीव— कमी दाबात रूपांतर होत आहे. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी चक्रीवादळात रूपांतर होऊन 3 रोजी त्याचा वेग वाढेल. 4 रोजी ते दुपारपर्यंत उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध— प्रदेश किनारपट्टी जवळून जाईल. त्याचा वेग ताशी 100 कि.मी. इतका असेल.
हेही वाचा