पुणे : डेक्कन-एरंडवणे भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : डेक्कन-एरंडवणे भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या एसएनडीटी भागातील पाण्याच्या टाक्यांना, जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी फ्लोमीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील पाणीपुरवठा येत्या बुधवारी (दि. 1) बंद राहणार आहे. दुसर्‍या दिवशी गुरुवारी (दि. 2) संबंधित परिसरातील पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी कळविले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर, एसएनडीटी परिसर, प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, एरंडवणे, नवसह्याद्री सोसायटी, मयूर कॉलनी, डेक्कन परिसर, कोथरूड, संगम प्रेस रोड, करिश्मा सोसायटी, हॅपी कॉलनी, सहवास सोसायटी, कर्वेनगर परिसर, म्हात्रे पूल ते राजाराम पूल, श्रीमान सोसायटी परिसर, मनमोहन सोसायटी परिसर, कर्वे पुतळा परिसर, आयडियल कॉलनी परिसर, पौड रस्ता, भांडारकर रस्ता इत्यादी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news