Harshada Bhosale Corporator PMC: पाच वर्षांत वारजेचा सर्वांगीण विकास; मूलभूत समस्या सोडविण्याचा हर्षदा भोसले यांचा निर्धार

वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, रस्ते व महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणार
दै. ‌‘पुढारी‌’चे मुख्य संपादक पद्मश्री ड्रॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ‌‘सिंहायन‌’ हे आत्मचरित्र स्वीकारताना हर्षदा शंतनू भोसले.
दै. ‌‘पुढारी‌’चे मुख्य संपादक पद्मश्री ड्रॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ‌‘सिंहायन‌’ हे आत्मचरित्र स्वीकारताना हर्षदा शंतनू भोसले.Pudhari
Published on
Updated on

वारजे : वारजे पॉप्युलरनगर प्रभागात कचरा समस्या, ड्रेनेज, पावसाळी वाहिन्या, रस्ते डांबरीकरण, सुसज्ज पदपथ, खुली व्यायामशाळा, आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, स्मशानभूमीत विद्युतदाहिनी उभारणे तसेच वारजे मुख्य रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी आदी विविध समस्या सोडवून येत्या पाच वर्षांत वारजेचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार भाजपच्या नवनियुक्त नगरसेविका हर्षदा शंतनू भोसले यांनी व्यक्त केला.

दै. ‌‘पुढारी‌’चे मुख्य संपादक पद्मश्री ड्रॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ‌‘सिंहायन‌’ हे आत्मचरित्र स्वीकारताना हर्षदा शंतनू भोसले.
Maharashtra Sugar Production: राज्यात 2025-26 ऊस गाळप अंतिम टप्प्यात; साखर उत्पादनात मोठी वाढ

भोसले यांनी रविवारी (दि. 8) दैनिक ‌‘पुढारी‌’ कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी वारजे प्रभागातील विविध समस्यांचा आढावा घेत त्या सोडविण्या साठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. भोसले या वारजे पॉप्युलरनगर- प्रभाग 32 मधील (अ) गटातून 26 हजार 310 मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार) गटाच्या उमेदवार अश्विनी कांबळे यांचा पराभव केला. आपल्या राजकीय प्रवासाबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या की, मी वाणिज्य शाखेची पदवीधर आहे. महापालिकेचे राजकारण मला नवीन असले तरी, माझे सासरे भाजपचे प्रभाग अध्यक्ष वासुदेव भोसले यांनी या प्रभागात भरपूर काम केले, त्यामुळेच मी इतक्या मोठ्या फरकाने विजयी होऊ शकले.

दै. ‌‘पुढारी‌’चे मुख्य संपादक पद्मश्री ड्रॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ‌‘सिंहायन‌’ हे आत्मचरित्र स्वीकारताना हर्षदा शंतनू भोसले.
Kyasanur Forest Disease Vaccine: माकड तापावर नियंत्रणासाठी स्वदेशी लस; मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा सुरू

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या विकास निधीतून त्यांनी प्रभागात कोट्यवधीची विकासकामे केली आहेत. प्रभागातील 4 सोसायट्यांमध्ये शासकीय योजनेद्वारे सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प राबविला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारलेल्या कट्‌‍ट्यांमार्फतही ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित उपक्रम राबविले जात आहेत. अतुलनगर येथील जनसंपर्क कार्यालयातील ई-सेवा केंद्रामार्फत शासनाच्या विविध योजना नागरिकांना मिळवून देण्याचे काम अविरत सुरू आहे. तसेच, आरोग्य शिबिरे व बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे.

दै. ‌‘पुढारी‌’चे मुख्य संपादक पद्मश्री ड्रॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ‌‘सिंहायन‌’ हे आत्मचरित्र स्वीकारताना हर्षदा शंतनू भोसले.
Ultra Processed Food India: ‘जेन झी’चा अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाकडे वाढता कल; लहान वयातच आजारांचा धोका

वारजे एनडीए मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अपूर्ण सेवा रस्ते, रखडलेला डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर डीपी रस्ता तसेच पावसाळ्यात वारजे सेवा रस्त्यावर पॉप्युलरनगरसमोरील नाल्यातून तुंबून येणारे पावसाचे पाणी, या समस्या प्रधान्याने सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. तसेच, कचरा समस्येबाबत योग्य नियोजन आणि जनजागृती करून, यावर तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दै. ‌‘पुढारी‌’चे मुख्य संपादक पद्मश्री ड्रॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ‌‘सिंहायन‌’ हे आत्मचरित्र स्वीकारताना हर्षदा शंतनू भोसले.
BARC Spin Off Technology: बीएआरसी–एसपीपीयू करार; ‘आकृती केंद्रा’तून संशोधन तंत्रज्ञान थेट उद्योगात

ही कामे प्राधान्याने हाती घेणार..

वाहतूक कोंडीमुळे वारजे मुख्य रस्तारुंदीकरणासाठी पाठपुरावा करणार.

कचरा समस्या सोडविण्यासाठी जनजागृती व योग्य उपाययोजना करणार.

अपूर्ण असलेला सेवारस्ता आणि डुक्कर खिंड ते तिरुपतीनगर डीपी रस्ता पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार.

पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी पावसाळी गटारनिर्मितीवर भर.

महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news