

महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत वारजे भागातून राष्ट्रवादी काँग््रेासचे चारही नगरसेवक निवडून आले होते. आता वारजे-पॉप्युलरनगर या नव्या प्रभागाला (क्र. 32) शिवणे परिसर जोडण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग््रेासमध्ये पडलेल्या फुटीमुळेे या प्रभागात दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने येणार असून, त्यांच्यापुढे भाजपचेे आव्हान असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीतील फुटीचा फायदा भाजपला होणार का? याबाबत उत्सुकता आहे.
वारजे एनडीए मुख्य रस्त्याच्या अलीकडील रामनगर, शिवणे आणि रस्त्याच्या पलीकडे माळवाडी तसेच राजयोग परिसर ते डुक्कर खिंडपर्यंतच्या भागाचा या प्रभागात समावेश आहे. रामनगर वसाहत, गोकूळनगर पठार भागासह सोसायट्यांचा भाग देखील या प्रभागात येतो. या प्रभागात 82 हजार 537 मतदार असून, यात 9 हजार 982 अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील मतदारांचा समावेश आहेत. तसेच, अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील मतदारांची संख्या 1 हजार 436 इतकी आहे. यामुळे या प्रभागात एक जागा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे.
या प्रवर्गातून अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार रिंगणात उतरणार असल्याने खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील दिग्गज उमेदवारांना एकमेकांसमोर आपली बाजी पणाला लावून निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच, सर्वसाधारण (महिला) प्रवर्गातून सर्व महिला इच्छुकांना एकमेकांसमोर निवडणूक लढवावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग््रेासची ताकद असलेल्या या प्रभागात 2017 ची निवडणूक स्वतंत्रपणे झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग््रेासचे अजित पवार आणि शरद पवार, असे दोन गट झाले. गेल्या वेळी निवडून आलेल्या उमेदवारांपैकी सचिन दोडके हे शरद पवार गटात सामील झाले आहेत. तर उर्वरित दिलीप बराटे, दीपाली धुमाळ, सायली वांजळे-शिंदे हे अजित पवार गटात आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासचे दोन गट पडल्याने या वेळी पक्षाच्या मतांची विभागणी होणार आहे. तसेच गेल्या निवडणुकीत भाजपचे किरण बारटक्के, सचिन दशरथ दांगट, श्रद्धा काळे, शोभा धुमाळ यांना देखील चांगली मते मिळाली होती.
काँग््रेासचे सचिन बराटे यांना तीन क्रमांकाची मते मिळाली होती. आगामी निवडणुकीत मात्र घड्याळ, तुतारी, भाजप यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार गटाकडून दिलीप बराटे, दीपाली धुमाळ, सायली वांजळे-शिंदे, राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार गटाकडून सचिन दोडके, अतुल दांगट तसेच भाजपकडून किरण बारटक्के, रोहिणी भोसले, मनीषा दांगट, राजू पाटील, सागर बराटे आदी इच्छुक आहेत. काँग््रेासमधून सचिन बराटे, सुजाता झंजे, दत्ता झंजे मनसेकडून कैलास दांगट, रियाज शेख, सतीश काळेकर, केशर सोनवणे तसेच आम आदमी पक्षाकडून नीलेश वांजळे, सुरेखा भोसले, समाजवादी पक्षाकडून विनायक लांबे यांची नावे चर्चेत आहेत.
भारतभूषण बराटे, अर्चना ढेणे, प्राची हिंगे हे देखील इच्छुक असून, त्यांचा पक्ष अद्याप निश्चित नाही. हा प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला असल्याने भाजपकडून स्नेहलताबलाढे, प्रियंका भिसे, ज्योती गोंडाळ, सीमा वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) अश्विनी कांबळे, आरपीआयकडून संगीता आठवले, नीलेश आगळे, अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) जयंती कदम, आम्रपाली कदम यांची नावे चर्चेत आहे. तसेच प्रभाकर भोरकडे, दीपाली धिवार, मोनिका घोडके, अनिता शिंगाडे, आसावरी शिरसाठ हेदेखील इच्छुक आहेत.
सर्व पक्षांत इच्छुकांची संख्या जास्त
महापालिका निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी होणार की नाही, यावर देखील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या प्रभागात प्रमुख पक्षांसह इतर पक्षांमध्येही इच्छुकांची संख्या जास्त प्रमाणात असल्याने तिकीट नाकारले किंवा महाविकास आघाडी झाली नाही, तर इच्छुक निवडणूक लढविण्यासाठी तिकीट मिळेल त्या पक्षांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांपैकी कोणाला प्रमुख पक्षांची तिकिटे मिळणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.
महिला इच्छुकांची कोंडी
या प्रभागात 9 हजार 982 मतदार अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील आहेत. यामुळे या प्रभागातील एक जागा अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव झाली आहे. परिणामी, इतर सर्व महिला इच्छुकांना सर्वसाधारण प्रवार्गातून निवडणूक लढवावी लागणार असून, त्या एकमेकांसमोर येणार आहेत. प्रभागात महिला इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तिकिटासाठी मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.