Pune Smart Meter Protest: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात काँग्रेसचे आंदोलन; फडणवीस सरकारवर पुण्यात टीकेची झोड

अदानीला फायदा पोहोचवण्यासाठी स्मार्ट मीटरची सक्ती केल्याचा आरोप; महावितरण कार्यालयाबाहेर काँग्रेसचा निषेध
Pune Smart Meter Protest
Pune Smart Meter ProtestPudhari
Published on
Updated on

पुणे: अदानीची तिजोरी भरण्याच्या नादात फडणवीस सरकारने सामान्य पुणेकरांवर स्मार्ट मीटरची सक्ती सुरू केली आहे. हे स्मार्ट मीटर सर्वसामान्य नागरिकांची लूट करणारे आहे. स्मार्ट सिटी बनविण्याचे वचन देऊन सत्तेत आलेले फडणवीस पुणे शहराला उद्ध्वस्त करून नागरिकांच्या माथी स्मार्ट मीटर मारत आहेत.

Pune Smart Meter Protest
Kedgaon Sex Determination Case: केडगाव गर्भलिंगनिदान प्रकरणात मोठी कारवाई; डॉ. संगीता गायकवाड अटकेत

अदानीचा फायदा करण्यासाठी लाखो पुणेकर नागरिकांना फडणीस सरकार लुबाडत आहे. तसेच, महावितरणच्या जागेत अदानी कंपनीला कार्यालयासाठी जागा देऊन फडणवीस सरकारने अदानीसमोर थेट लोटांगण घातले आहे.

Pune Smart Meter Protest
SPPU Mess License Suspends: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिफेक्टरी मेसचा परवाना तात्पुरता निलंबित

फडणवीस सरकारच्या या मनमानीविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप व पुणे (पश्चिम) शहराध्यक्षा दीप्ती चवधरी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. रास्ता पेठमधील महावितरण कार्यालयाबाहेर असंख्य नागरिकांनी फडणवीस सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला.

Pune Smart Meter Protest
Gosavivasti SRA Scam: गोसावीवस्ती एसआरए योजनेत १ हजार कोटींचा घोटाळा? बोगस झोपड्या आणि सरकारी जागांचा समावेश

तसेच, काँग्रेसच्या वतीने महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना स्मार्ट मीटरसंबंधित, महावितरणच्या कार्यालय आवारातील अदानीचे कार्यालय हटविण्यासाठी निवेदन देण्यात आले. या वेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांच्यासमवेत नगरसेविका अश्विनी लांडगे, सायरा शेख, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे,

Pune Smart Meter Protest
PMPML New Buses Parking Land: पीएमपीच्या १५०० नव्या बसांसाठी १०० एकर जागेची मागणी

संगीता पवार, यशराज पारखी, भाऊसाहेब आजबे, द. स. पोळेकर, रमेश सोनकांबळे, सुरेश कांबळे, अविनाश अडसूळ, मजहर मणियार, सुनील पंडित, संजय कवडे, दीपक ओव्हाळ, चेतन अगरवाल, सतीश पवार, अकबर शेख, वाल्मीक जगताप, दादाश्री कामठे, भगवान कडू, संतोष सुपेकर, अमित कांबळे, माऊली मोरे, पप्पू घोलप, आसिफ शेख, जुबेरबाबू शेख, आयुब पठाण, परवीन तांबोळी, जिनाद सय्यद आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news