Wafgaon Primary Health Centre: वाफगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची मनमानी

रात्रीची सेवा बंद, उपकेंद्रात वर्षानुवर्षे डॉक्टरच नाहीत
Doctors
DoctorsPudhari
Published on
Updated on

राजगुरुनगर: वाफगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व कनेरसर उपकेंद्र येथील वैद्यकीय सेवेत गंभीर अनियमितता असल्याची तक्रार खेड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक व गोसासीचे माजी सरपंच संतोष अनंत गोरडे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने यांच्याकडे केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, वाफगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉ. मेघना जाधव (प्रथम वैद्यकीय अधिकारी) व डॉ. शरद चौधरी (द्वितीय वैद्यकीय अधिकारी) असे दोन निवासी डॉक्टर कार्यरत आहेत.

Doctors
Katewadi Palkhi Ringan: काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी!

ग्रामीण भागातील या केंद्रासाठी २४ तास वैद्यकीय सेवा आवश्यक असताना दोन्ही डॉक्टर फक्त पगार घेण्यासाठी काम करत असल्याचे दिसत आहे. डॉ. मेघना जाधव एक आठवडा आणि डॉ. शरद चौधरी पुढील एक आठवडा अशी पाळीपाळीने सेवा देत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पद्धतीला तालुका वैद्यकीय विभागाकडून परवानगी मिळाली आहे का, मिळाली असेल तर कोणत्या नियमानुसार, याची माहिती द्यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

यासह प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव येथे वाहनचालक पद रिक्त आहे. रात्री-अपरात्री आपत्कालीन परिस्थिती वेळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे वाहनचालकाची रिक्त जागा तात्काळ भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.कनेरसर प्राथमिक उपकेंद्राची स्थिती आणखी गंभीर असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Doctors
Pune Crime News: पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; केशवनगरमध्ये रात्री वाहनांची तोडफोड, थरार CCTV मध्ये कैद

दोन दिवसांपूर्वी अंबिका विद्यालय, कनेरसर येथील एका विद्यार्थ्याला चक्कर आल्याने त्याला उपकेंद्रात नेले असता, अनेक वर्षांपासून तेथे डॉक्टरच नसल्याची माहिती समोर आली. यामुळे कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे संतोष गोरडे यांनी सांगितले.

तक्रार अर्जात जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. या तक्रारीची प्रत आमदार बाबाजी काळे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे गटनेते ॲड विजयसिंह शिंदे पाटील व जिल्हा परिषद सदस्या दीप्तीताई भोगाडे यांना पाठविण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांबाबत वारंवार तक्रारी येत असताना प्रशासन कधी कृती करणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news