Pune Crime News: पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; केशवनगरमध्ये रात्री वाहनांची तोडफोड, थरार CCTV मध्ये कैद

Pune Vehicle Vandalism: पुण्यातील मुंढवा येथील केशवनगरमध्ये पहाटे तीन अज्ञात तरुणांनी कोयत्याच्या साहाय्याने अनेक वाहनांची तोडफोड केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Pune Vehicle Vandalism Keshav Nagar Mundhwa
Pune Vehicle Vandalism Keshav Nagar MundhwaPudhari
Published on
Updated on

Pune Vehicle Vandalism: पुण्यातील मुंढवा परिसरातील केशवनगरमध्ये शुक्रवारी पहाटे तीन अज्ञात तरुणांनी कोयत्याच्या साहाय्याने अनेक वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 जुलै रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास तीन तरुण दुचाकीवरून केशवनगर परिसरात आले. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. परिसरात फिरताना ते मोठ्याने ओरडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

Pune Vehicle Vandalism
Pune Vehicle VandalismPudhari

यानंतर त्यांनी एका बंगल्यासमोर उभ्या असलेल्या कारवर कोयत्याने वार करत तोडफोड केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या इतर अनेक वाहनेही फोडली आहेत. या हल्ल्यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

Pune Vehicle Vandalism Keshav Nagar Mundhwa
Pune House Burglary: पुण्यात घरफोड्यांचा धुमाकूळ; सिंहगड रोड, लोहगाव, नऱ्हेत तीन घरांना चोरट्यांचे लक्ष्य

घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

प्राथमिक तपासात हा प्रकार जुन्या वादातून घडला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

Pune Vehicle Vandalism Keshav Nagar Mundhwa
Pune Jewellery Shop Theft: पुण्यात सराफी पेढीवर धाडसी डल्ला; भिंतीला भगदाड पाडून ३५ तोळे सोने, सव्वा किलो चांदी लंपास

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगच्या घटना आणि वाहनांची तोडफोड वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news