

पुणे: पालखी प्रस्थान सोहळा सुरू होण्याच्या वेळेसच व्हीव्हीआयपींची देहूच्या मंदिरामध्ये एन्ट्री झाली. त्यामुळे पालखी सोहळ्यासमोरील मानाच्या दिंड्यांना बराच वेळ थांबावे लागले. त्यामुळे या दिंड्यांमधील वारकरी संतापले अन् येथे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी (दि. 18) प्रस्थान झाले. सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक व्हीआयपींची उपस्थिती होती. (Latest Pune News)
त्यांच्याच उपस्थितीत पालखी सोहळा प्रस्थानाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. त्याच वेळी मानाच्या दिंड्यांमधील वारकरी प्रतीक्षा करावी लागल्यामुळे संतापले. मात्र, पुन्हा येथील परिस्थिती सुरळीत झाली.
व्हीआयपींच्या दर्शनासाठी वारकर्यांना थांबवण्यात आले. त्यामुळे वारकर्यांनी येथे गोंधळ घातला अन् नाराजी व्यक्त केली. याबाबत पालखी प्रस्थान सोहळ्यातून बाहेर पडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, ‘वारकरी संयमी असतात, शांत असतात. ते याबाबत कधीही नाराजी व्यक्त करणार नाहीत. माध्यमांनी उगाच विषय वाढवण्याचे काम करू नये. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.