

पुणे: नेहमी आपण आपल्या इच्छा मागणे स्वरूपात आपण देवाकडे व्यक्त करत असतो. कोणाला काय द्यायचं, कोणाला काय नाही द्यायचं हा देवाचा प्रश्न असतो. तेव्हा पांडुरंग सर्वांच्या मनोकामना ऐकतील, अन् भविष्यात दादाही मुख्यमंत्री होतील, अशी मला आशा आहे, असे अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत खासदार सुनेत्रा पवार म्हणाल्या.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात उपस्थित राहून सुनेत्रा पवार यांनी मंदिरात दर्शन घेतले अन् त्यानंतर त्यांनी फुगडी खेळण्याचा आनंदही घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Latest Pune News)
यावेळी त्या म्हणाल्या, दरवर्षी मी या सोहळ्याला येत असते. एखादे वर्ष चुकले असेल. मला या सोहळ्याविषयी, वारकर्यांविषयी आस्था आहे. त्यामुळे मी नेहमीच या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करते. अन् आजही यासाठीच आले आहे. मायबाप जनता, शेतकर्यांसाठी मी पांडुरंगाकडे साकडे घालते. पाऊस चांगला पडू दे, हे मागणे मागितले. बारामती ते काटेवाडीपर्यंत पालखी सोहळ्यात मी चालते, असेही त्यांनी सांगितले.