VSI New Sugarcane Varieties: व्हीएसआयचे नवे दोन ऊस वाण शेतकऱ्यांसाठी सज्ज; हेक्टरी १४५ टनांपर्यंत उत्पादनाची क्षमता

१५ वर्षांच्या संशोधनातून विकसित वाण २०२७-२८ मध्ये उपलब्ध होणार; ८६०३२ पेक्षा अधिक फायदेशीर ठरण्याची अपेक्षा
Sugarcane
SugarcanePudhari
Published on
Updated on

किशोर बरकाले

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) आंबोली प्रक्षेत्रावर प्रामुख्याने देशातील एक हजार 459 ऊस जातींचे जतन केले आहे. त्यामधील 15 वर्षांच्या दीर्घ संशोधनानंतर व्हीएसआयच्या ऊस शास्त्रज्ञांच्या चमूकडून अधिक उत्पादन देणारे दोन नवे वाण विकसित केले आहेत. त्यामध्ये प्रतिहेक्टर 143.72 टन उत्पादन देणारे व्हीएसआय 21121 आणि प्रतिहेक्टर 145.89 टन उत्पादन देणारा व्हीएसआय 25121 या दोन नव्या ऊस वाणांचा समावेश आहे. त्यातील पहिला वाण 2027 मध्ये, तर दुसरा वाण 2028 मध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपलब्ध होतील.

Sugarcane
Pune District Rainfall Update: पुणे जिल्ह्यात पावसाचा विक्रम; जुलैअखेर सरासरीच्या १६९ टक्के पाऊस, दुष्काळाचे सावट दूर

व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे महासंचालक संभाजी कडू पाटील यांच्याकडून सातत्याने संशोधनाचे कामासाठी व शास्त्रज्ज्ञांना प्रोत्साहन देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती देताना व्हीएसआयचे प्रमुख शास्त्रज्ज्ञ डॉ. अशोक कडलग म्हणाले, महाराष्ट्र कृषिशिक्षण व संशोधन परिषदेच्या अंतर्गत राज्यातील चारही कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर 2026 मध्ये या विद्यापीठांची जाॅईंट ॲग्रेस्कोची बैठक होणार आहे. त्यामध्ये व्हीसआयकडून संशोधित या दोन्ही ऊसजातींचा विषय ठेवण्यात येणार आहे. त्यांची शिफारस प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी हे दोन्ही ऊस वाण प्रसारित करण्यात येतील. उसाच्या 86032 पेक्षा व्हीएसआयकडून संशोधित हे दोन्ही वाण शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरतील, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

Sugarcane
Maharashtra Farmers Loan Waiver: २ लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार; ‘हेअर कट’मुळे संभ्रम नको: कृषिमंत्री भरणे

व्हीएसआय २११२१ (व्हीएसआय १२५-२) ची वैशिष्ट्ये

मातृत्व- पितृत्व - टीसी 2513 X 2000-08, प्रसारित वर्ष - पूर्व प्रसारित 2026, पक्वता महिने - मध्यम उशिरा 14 महिने, लागवड हंगाम - पूर्वहंगाम व सुरू, शिफारस - महाराष्ट्र राज्यासाठी, ऊस उत्पादन प्रतिहेक्टर - 143.72 टन, साखर उत्पादन हेक्टरी टनात - 19.70, रसातील शर्करेचे प्रमाण - 19.15 टक्‍के, विशेष गुणधर्म - जास्त ऊस व साखर उत्पादन देणारी, चांगला खोडवा देणारी, पाण्याचा ताण सहन करणारी, कमी तुरा येणारी, काणी रोगास मध्यम प्रतिकारक अशी ही ऊस जात आहे.

Sugarcane
SPPU Fake Degree Case: पुणे विद्यापीठातील बनावट बी.कॉम. पदवी प्रकरण तापले; विद्यार्थ्यांचे आंदोलन, मास्टरमाईंडचा शोध सुरू

व्हीएसआय २५१२१ (व्हीएसआय ४९०-१३) ची वैशिष्ट्ये

मातृत्व-पितृत्व - व्हीएसआय 15122 X को 97015, पक्वता महिने - लवकर 12 महिने, * लागवड हंगाम - पूर्वहंगाम आणि सुरू, शिफारस - महाराष्ट्र राज्यासाठी, ऊस उत्पादन प्रतिहेक्टर - 145.89 टन, साखर उत्पादन हेक्टरी टनांत - 21.15, रसातील शर्करेचे प्रमाण - 20.51 टक्‍के, विशेष गुणधर्म - जास्त उत्पादन, जास्त शर्करा, जाड ऊस, चांगला खोडवा, कमी तुरा येणारी, काणी रोगास प्रतिकारक, खोड किड व कांडी किडीस मध्यम प्रतिकारक अशी ही ऊस जात आहे.

Sugarcane
Maharashtra Kharif Sowing Update: राज्यात खरिपाच्या ८४ टक्के पेरण्या पूर्ण; निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ८५ कंपन्यांविरोधात गुन्हे

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) आंबोली येथील संशोधन केंद्रावर विकसित केलेले व्हीएसआय 21121 व 25121 हे उच्च उत्पादकता व उत्कृष्ट गुणवत्तेचे नवे दोन ऊस वाण लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत. ऊस उत्पादन वाढविण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्‍स्‍टिट्यूट, मांजरी, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news