Maharashtra Farmers Loan Waiver: २ लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार; ‘हेअर कट’मुळे संभ्रम नको: कृषिमंत्री भरणे

कर्जमाफीच्या यादीतील कमी रकमेचे कारण स्पष्ट; ई-केवायसीनंतर पात्र शेतकऱ्यांना मिळणार कर्जमुक्ती प्रमाणपत्र
Dattatray Bharne
Dattatray BharnePudhari
Published on
Updated on

पुणे: राज्यातील ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज रक्कम २ लाखांपर्यंत आहे, त्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. ''हेअर कट''मुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, संबंधित बँकांशी समन्वय साधून या सर्व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येत असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Dattatray Bharne
SPPU Fake Degree Case: पुणे विद्यापीठातील बनावट बी.कॉम. पदवी प्रकरण तापले; विद्यार्थ्यांचे आंदोलन, मास्टरमाईंडचा शोध सुरू

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (पीडीसीसी) बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पहिल्या टप्प्यातील १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांपैकी सुमारे पाच लाख शेतकऱ्यांची ईकेवायसी पूर्ण झाली आहे. 'हेअर कट' म्हणजे राज्य शासन आणि बँका यांच्यातील आर्थिक समझोता असून, कर्जमाफीमध्ये सरकार आणि बँकांनी किती रक्कम उचलायची याचे सूत्र आहे.

Dattatray Bharne
Maharashtra Kharif Sowing Update: राज्यात खरिपाच्या ८४ टक्के पेरण्या पूर्ण; निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ८५ कंपन्यांविरोधात गुन्हे

याचा अर्थ शेतकऱ्यांचे कर्ज कमी करणे असा नसून, सरकार आणि बँका यांच्यातील कर्ज रकमेचा आर्थिक वाटा निश्चित करणे हा त्यामागील उद्देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील प्रत्यक्ष थकीत रक्कम आणि शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीतील रक्कम यामध्ये तफावत दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात माझे संपूर्ण कर्ज माफ झाले का नाही? असा संभ्रम निर्माण झाला आहे.

Dattatray Bharne
Pune PMC Cleaning Tender: महापालिकेच्या स्वच्छता निविदेवर महासभेत संताप; 'ठेकेदारधार्जिणी' निविदा रद्द करण्याची सर्वपक्षीय मागणी

मात्र, शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार असून, पात्र शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचे प्रमाणपत्र मिळणार असून, दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देण्याच्या सूचना बँकांना दिल्याचे भरणे म्हणाले.

Dattatray Bharne
Pune Birth Death Certificate Delay: जन्म-मृत्यू दाखल्यांवरून महासभेत गदारोळ; नागरिकांना महिनोनमहिने प्रतीक्षा, प्रशासनावर दिशाभूल केल्याचा आरोप

हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या घरी जाऊन पेढा भरवणार

राज्यात एल निनोमुळे पाऊस कमी राहणार, असे चित्र मे महिन्यात निर्माण झाले होते. त्यावेळी ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी एल निनो असला तरी पर्जन्यमान चांगले होण्याचा अंदाज सुरुवातीसच आपणासमोर वर्तविला होता आणि तो अंदाज खरा ठरत असल्याबद्दल विचारले असता, कृषिमंत्री भरणे म्हणाले, मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना पेढा भरवणार आहे. पुरस्काराबद्दल नंतर विचार करू, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news