Indradev Maharaj Case: वृंदावनच्या इंद्रदेव महाराजांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल; तृप्ती देसाई यांची अटकेची मागणी

नाडी तपासण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप; दोन्ही आश्रम सील करून इतर पीडित महिलांच्या तक्रारी नोंदवण्याची मागणी
Assault
AssaultPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: मुंबईतील पीडित महिलेच्या तक्रारीवरून वृंदावन येथील इंद्रदेव महाराजांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Assault
Pune Social Media Defamation Case: महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षांवरील अश्लील टिपण्णी प्रकरण; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

देसाई म्हणाल्या, 28 ऑक्टोबर रोजी मीरा-भाईंदर येथील काशिमीरा पोलिस ठाण्यात झिरो क्रमांकाने गुन्हा दाखल करून तो वृंदावन पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. महाराजांनी नाडी तपासण्याच्या बहाण्याने महिलांना खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच धमक्या दिल्याचा आरोप तक्रारीत आहे.

Assault
Pune Municipal Corporation Diwali Gifts Ban: पुणे महापालिकेचा दिवाळी भेटवस्तूंना नकार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना ठेकेदारांकडून गिफ्ट घेण्यास बंदी

तृप्ती देसाई यांनी महाराजांना तातडीने अटक करण्याची, दोन्ही आश्रम सील करण्याची आणि इतर संभाव्य पीडित महिलांच्या तक्रारी नोंदवून घेण्याची मागणी केली आहे. आणखी दोन ते तीन महिला संपर्कात असून, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार केल्याचा आरोप असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय दबावामुळे कारवाई थांबवली जात असून, भूमाता ब्रिगेडने या प्रकरणात निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.