Pune Municipal Corporation Diwali Gifts Ban: पुणे महापालिकेचा दिवाळी भेटवस्तूंना नकार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना ठेकेदारांकडून गिफ्ट घेण्यास बंदी

मिठाई, फराळ, ड्रायफ्रूट्स, गिफ्ट हॅम्पर्स आणि रोख रक्कम स्वीकारण्यास मनाई; नियम मोडणाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: दिवाळीच्या सणानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याच्या प्रथेला महापालिका प्रशासनाने यंदा लगाम घातला आहे. ठेकेदार, विकासक आणि व्यावसायिकांकडून येणाऱ्या दिवाळीच्या भेटी स्वीकारण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे.

Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation Loan: पुणे महापालिका ५०० कोटींच्या ठेवी ठेवून ४५० कोटींचे कर्ज उभारणार; निर्णयावर आक्षेप

मिठाईचे बॉक्स, फराळ, ड्रायफ्रूट्स, गिफ्ट हॅम्पर्स, गिफ्ट व्हाउचर्स, रोख रक्कम किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील भेटवस्तू स्वीकारता येणार नाहीत. एवढेच नव्हे, तर महापालिकेच्या मुख्य इमारतीसह विभागीय, क्षेत्रीय आणि उपकार्यालयांच्या परिसरात अशा भेटवस्तू आणणे आणि त्यांचे वितरण करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.

Pune Municipal Corporation
Sharad Pawar Health Update: शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा, रुबी हॉल क्लिनिकने दिली हेल्थ अपडेट; डिस्चार्ज कधी मिळणार?

दिवाळीच्या काळात महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ठेकेदार, विकासक, वास्तुविशारद, सल्लागार, पुरवठादार आणि व्यावसायिकांकडून मिठाई, फराळ तसेच विविध भेटवस्तू दिल्या जातात. काही वेळा वैयक्तिक स्वरूपात, तर काही वेळा थेट कार्यालयांमध्ये या भेटवस्तूंचे वाटप केले जाते. मात्र, संबंधित व्यक्तींकडून भेटवस्तू स्वीकारल्यास प्रशासकीय निर्णयप्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

Pune Municipal Corporation
Rana Suryavanshi Attack Case: राणाजी... माफ करना...गलती म्हारेसे हो गई

विशेषतः निविदा, कामांच्या मंजुरी, गुणवत्ता तपासणी आणि ठेकेदारांच्या देयकांशी संबंधित निर्णयांवर अप्रत्यक्ष प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम १२ च्या तरतुदींनुसार शहर अभियंता पावसकर यांनी दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी हे परिपत्रक जारी केले आहे. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने संबंधित व्यक्ती अथवा संस्थांकडून वैयक्तिक स्वरूपात भेटवस्तू स्वीकारू नयेत, असे त्यात स्पष्ट केले आहे.

Pune Municipal Corporation
Pune Weather Forecast: पुण्यातील पावसाचे सावट दूर; गुरुवारपासून कोरडे हवामान

आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी

आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी विभागप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. त्यांनी अधिनस्त कर्मचाऱ्यांना सूचना देऊन नियमांचे पालन करून घ्यायचे आहे. तसेच, सुरक्षा विभागाला भेटवस्तू घेऊन येणाऱ्या व्यक्तींना कार्यालयीन परिसरात प्रवेश न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेत कोट्यवधी रुपयांची विकासकामे ठेकेदारांमार्फत केली जातात. त्यामुळे हितसंबंध निर्माण होण्याची शक्यता टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि नियमभंग करणाऱ्यांवरील कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.