

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ अधिकारी विष्णु महाराज चक्रांकित (वय 86) यांचे आळंदी येथे रविवारी रात्री निधन झाले .त्यांच्यावर सोमवारी सकाळी अकरा वाजता इंद्रायणी तीरावर अंत्यसंस्कार होणार आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपुढे सलग पन्नास वर्ष त्यांनी हरिपाठ कीर्तन सेवा केली. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान सुवर्णाक्षरात तयार केले. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती पंडित शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते प्रकाशित करून श्री माऊलींच्या मंदिरामध्ये त्याची प्रतिष्ठापना केली.
हेही वाचा :