School Assault: सात वर्षीय विद्यार्थिनीला शिक्षकाची अमानुष मारहाण; वेल्हे बुद्रुक ZP शाळेतील धक्कादायक प्रकार

परीक्षा न लिहिल्याच्या कारणावरून निर्दयी मारहाण; स्थानिक दबावामुळे तक्रार नोंदवण्यापूर्वीच प्रकरण मिटले
School Assault
School AssaultPudhari
Published on
Updated on

खडकवासला: कष्टकरी बेलदार समाजातील सात वर्षांच्या बालिकेला शिक्षकाने अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार राजगड तालुक्यातील तोरणागडाच्या पायथ्याच्या वेल्हे बुद्रुकमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडला. मात्र, कथित शिक्षकाने माफी मागितल्याने सदरचे प्रकरण मिटविण्यात आले आहे.

School Assault
Navale Bridge Protest: नवले पुलावर बोंबाबोंब व ‘तिरडी आंदोलन’; वाढत्या मृत्यूंवर नागरिकांचा तिव्र संताप

शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापकांसह शिक्षण विभागाचे अधिकारी, तथाकथित समाजसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी जिवाचा आटापिटा करून अखेर शुक्रवारी (दि. 14) दुपारी प्रकरण मिटवण्यात आले.

School Assault
Navale Bridge Accident FIR: नवले पुलाचा भीषण अपघात; मृत ट्रेलरचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा

शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या सात वर्षांच्या विद्यार्थिनीचे नाव आरोही अजित चव्हाण असे आहे. शिक्षकाच्या अमानुष मारहाणीत तिच्या पाठीला, मानेवर खोलवर जखमा झाल्या आहेत. हा प्रकार बुधवारी (दि.12) दुपारी घडला. मात्र, तिसऱ्या दिवशीही तिच्या पाठीवर मारहाणीचे वण, जखमा दिसत आहेत. याबाबत तिचे वडील अजित चव्हाण यांनी सांगितले की, आरोही हिने परीक्षेचा पेपर लिहिला नाही, त्या कारणाने चिडलेल्या शिक्षकाने आरोहीला अमानुष मारहाण केली. त्यात ती गंभीर जखमी झाली. असे असले तरी अजित चव्हाण यांनी स्थानिक वेल्हे पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केला नाही.

School Assault
Navale Bridge Accident: नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’; पाच वर्षांत 115 जणांचा बळी

वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते म्हणाले, अजित चव्हाण व इतर नागरिक, महिला पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी आरोही हिच्यावर उपचार करण्यासाठी लेखी पत्र तातडीने देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात चव्हाण यांनी तक्रार दाखल केली नाही. वेल्हे बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक भरत शेंडकर म्हणाले, संबंधित शिक्षकाने असा प्रकार पुन्हा करणार नाही, असे सांगून माफी मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यात आले आहे, मात्र वास्तवात स्थानिक पातळीवर दबाव वाढल्याने अखेर प्रकरण मिटविण्यात आले आहे.

School Assault
Granthottejak Sanstha: ‘कोशांचा कोश’ प्रकल्प अंतिम टप्प्यात; जूनमध्ये प्रकाशनाची शक्यता

अजित चव्हाण हे मुळचे सातारा येथील आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते वेल्हे बुद्रुक येथे मिळेल तेथे राहुटी उभारून दगड फोडून कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहेत. मारहाण झाल्यापासून ते भयभीत झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news