Vegetables Market : भाज्यांचे भाव कडाडले; नागरीकांच्या खिशावर संक्रांत

Vegetables Market : भाज्यांचे भाव कडाडले; नागरीकांच्या खिशावर संक्रांत

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये संक्रांतीच्या सणामुळे हिरवी मिरची, वाटाणा व गाजराची विक्रमी आवक झाली. भोगी व संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फळभाज्यांसह पालेभाज्यांचे भाव कडाडले. कांदा, बटाटा व लसणाची आवक घटली. आवक घटूनही लसणाचे भाव स्थिर राहिले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची उच्चांकी आवक झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व म्हैस यांच्या संख्येत घट झाली, तर शेळ्या – मेंढ्या यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल 5 कोटी 20 लाख रुपये झाली.

कांद्याची एकूण आवक 4 हजार 500 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक 4,000 क्विंटलने घटून कमाल भाव 2,200 रुपयांवर स्थिरावले. बटाट्याची एकूण आवक 1,600 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक 1,400 क्विंटलने घटून भावात 200 रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव 1,800 रुपयांवरून 1,600 रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची 30 क्विंटल आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक 5 क्विंटलने घटून कमाल भाव 20 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 525 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 80 क्विंटलने वाढली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून ते 4 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा – एकूण आवक – 4,500 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,200 रुपये, भाव क्रमांक 2. 2,100 रुपये, भाव क्रमांक 3. 1,600 रुपये. बटाटा – एकूण आवक – 1,600 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,600 रुपये, भाव क्रमांक 2. 1,300 रुपये, भाव क्रमांक 3. 1,100 रुपये.

फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे – टोमॅटो – 370 क्विंटल (1,000 ते 2,000 रुपये), कोबी – 230 क्विंटल (800 ते 1,000), फ्लॉवर – 235 क्विंटल (1,500 ते 2,500), वांगी – 94 क्विंटल (5,000 ते 7,000), भेंडी – 83 क्विंटल (4,000 ते 5,000), दोडका – 72 क्विंटल (3,000 ते 4,000), कारली – 76 क्विंटल (3,000 ते 4,000), दुधीभोपळा – 68 क्विंटल (1,000 ते 2,500), काकडी – 78 क्विंटल (1,000 ते 1,500), फरशी – 64 क्विंटल (2,000 ते 3,000), वालवड – 130 क्विंटल (5,000 ते 7,000), गवार – 64 क्विंटल (6,000 ते 8,000), ढोबळी मिरची – 180 क्विंटल (2,000 ते 4,000), चवळी – 42 क्विंटल (2,000 ते 3,000), वाटाणा – 925 क्विंटल (3,500 ते 4,500), शेवगा – 43 क्विंटल ( 5,000 ते 7,000), गाजर – 500 क्विंटल (2,500 ते 3,000).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – मेथी – एकूण 40 हजार 500 जुड्या (4,000 ते 6,000 रुपये), कोथिंबीर – एकूण 38 हजार 900 जुड्या (5,000 ते 8,000 रुपये), शेपू – एकूण 6 हजार 200 जुड्या (800 ते 1,200 रुपये), पालक – एकूण 5 हजार 800 जुड्या (500 ते 900 रुपये).

जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 60 जर्शी गाईंपैकी 52 गाईंची विक्री झाली. (15,000 ते 70,000 रुपये). 95 बैलांपैकी 85 बैलांची विक्री झाली. (10,000 ते 40,000 रुपये), 110 म्हशींपैकी 95 म्हशींची विक्री झाली(30,000 ते 80,000 रुपये), 9 हजार 840 शेळ्या – मेंढ्यांपैकी 9,500 शेळ्यांची विक्री झाली. (2,000 ते 25,000 रुपये)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news