Pune Vegetable Prices: पुणे मार्केट यार्डात भाजीपाल्याची आवक घटली; लसूण, गवार, काकडीसह अनेक भाज्या महागल्या

उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा परिणाम; कमी आवक आणि वाढत्या मागणीमुळे निवडक भाज्यांच्या दरात 10 टक्क्यांची वाढ
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे लसूण, गवार, काकडी, ढोबळी मिरची, भुईमूग शेंग, मटार, पावटाच्या भावात 10 टक्क्यांनी भावात वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती मार्केट यार्डातील आडतदार निखिल भुजबळ यांनी दिली.

Vegetable
Pune Fruit Prices: पुण्यात कलिंगड, खरबूज आणि डाळिंबाच्या दरात वाढ; उन्हामुळे रसदार फळांना मोठी मागणी

घाऊक बाजारात रविवारी (दि. 31) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे 85 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत कमी आहे. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश येथून 14 ते 15 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, कर्नाटक आणि गुजरात प्रत्येकी 1 टेम्पो भुईमूग शेंग,

Vegetable
Pune Sabudana Bhagar Prices: पुणे मार्केट यार्डमध्ये साबुदाणा-भगरच्या दरात वाढ; उपवास हंगामामुळे मागणी तेजीत

इंदौर येथून गाजर 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 5 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार 7 ते 8 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 5 ते 6 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 8 टेम्पो, इंदौर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 35 टेम्पो इतकी आवक झाली.

Vegetable
Chakan Market Yard Onion Prices: चाकण मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढली; भाव स्थिर, भाज्यांच्या दरात तेजी

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 450 ते 500 गोणी, भेंडी 6 ते 7 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, टोमॅटो 8 हजार क्रेटस, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, काकडी 7 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, गाजर 8 ते 10 टेम्पो, तांबडा भोपळा 12 टेम्पो, घेवडा, पावटा प्रत्येकी 2 ते 3 टेम्पो, शेवगा 2 टेम्पो, भुईमूग शेंग 150 गोणी, कांद्याची सुमारे 80 टेम्पो इतकी आवक झाली.

Vegetable
Pune Fish Prices: पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंद; पुण्यात मासळीच्या दरात 20% पर्यंत वाढ

बहुतांश पालेभाज्याचे भाव स्थिर

मागणी आणि पुरवठ्यातील समतोलामुळे कांदापात आणि राजगिरा वगळता सर्व पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. केवळ कांदापातच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे 3 रुपयांनी वाढ झाली आहे. चाकवतच्या भावात जुडीमागे 2 रुपयांनी घट झाली आहे. येथील बाजारात रविवारी (दि. 31) कोथिंबिरीची 1 लाख जुडी आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे, तर मेथीची 40 हजार जुडी आवक झाली होती. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत जास्त आहे. मागील आठवड्यात 35 हजार जुडी आवक झाली आहे. कोथिंबीर आणि मेथीच्या जुडीला घाऊक बाजारात दर्जानुसार 15 ते 25 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news