Vadgav Nimbalkar Bhendi Cultivation: भेंडी पिकामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ; बाजारभाव उत्साही

बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना भेंडी उत्पादनातून रोख उत्पन्न; पुणे आणि स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी
Vadgav Nimbalkar Bhendi Cultivation
Bhendi CultivationPudhari
Published on
Updated on

वडगाव निंबाळकर: बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमधील शेतकऱ्यांना सध्या भेंडीच्या पिकाने चांगला आधार दिला आहे. भेंडी सध्या शेतकऱ्यांची तारणहार बनली असल्याची स्थिती आहे.

Vadgav Nimbalkar Bhendi Cultivation
Walhe Ambajichiwadi Water Shortage: पिण्याच्या पाण्याचा टंचाई प्रश्न; शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

गेल्या वर्षभरापासून भेंडीला समाधानकारक बाजारभाव मिळतो आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना भेंडीमुळे मोठा हातभार लागत आहे. भेंडी या पिकाची जोपासना करणे तसे अत्यंत अवघड काम आहे. परंतु, अल्पभूधारक शेतकरी मोठ्या कष्टाने आपल्या थोड्याशा शेतीमध्ये दहा ते वीस गुंठे क्षेत्रांत हे पीक घेत त्यापासून चांगली आर्थिक कमाई करीत आहेत.

Vadgav Nimbalkar Bhendi Cultivation
MASAP Dubara Voting 2026-2031: टपालाने न मिळालेल्या मतपत्रिका दुबार मतदानातून मिळवता येणार

या पिकाला सतत पाणी लागते. सर्वांत महत्त्वाचे ठरते ते तोडणी व्यवस्थापन. तोडणी व्यवस्थापन करणे ही अत्यंत किचकट बाब ठरते. भेंडी तोडण्यामुळे हाताच्या बोटांना मोठ्या प्रमाणात इजा होत असते. बोटाला फडकी गुंडाळूनच हे काम करावे लागते. त्यातही अनेकदा पिकांवर असलेली कुस बोटांना इजा पोहोचवत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भेंडी लागवड करणे शक्यतो टाळले जाते. मजुरांचा प्रश्नही दिवसेंदिवस अत्यंत जटिल बनत चालला आहे. त्यामुळे शेतकरी या पिकाच्या भानगडीत सहसा पडत नाहीत.

Vadgav Nimbalkar Bhendi Cultivation
Pune Airport Domestic Passengers 2025: पुणे विमानतळावर 2025 मध्ये देशांतर्गत प्रवाशांची संख्या 1 कोटी 5 लाखांवर पोहोचली

अन्य तरकारी पिकांच्या बाजारभावातील अनिश्चितता लक्षात घेऊन अल्पभूधारक शेतकरी मात्र हे पीक थोड्याच क्षेत्रात घेत आहे. त्यातून चांगले उत्पन्न काढून चांगला आर्थिक लाभ मिळवताना दिसत आहेत. बारामती तालुक्यातील बजरंगवाडी, कोऱ्हाळे बुद्रुक, मुढाळे, वडगाव निंबाळकर या गावांमध्ये सध्या शेकडो एकर भेंडी पिकाची लागवड झालेली दिसत आहे.

Vadgav Nimbalkar Bhendi Cultivation
Pune Mefedrone Bust: वाघोलीत मेफेड्रोन तस्करी; दोघांना पोलिसांची अटक, 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

भेंडी लावल्यापासून साधारणत: 40 ते 45 दिवसांमध्ये पहिला तोडा सुरू होतो. तेथून पुढे प्रत्येक तोड्याला उत्पन्न वाढत जाते. बाजारात सर्वसाधारणपणे सध्या भेंडीला 70 ते 80 रुपये किलो बाजारभाव मिळत आहे. या परिसरातील भेंडी मोठ्या प्रमाणात शेवाळवाडी येथील मार्केटला विक्रीला नेली जाते. स्थानिक आठवडे बाजाराचाही पर्याय शेतकऱ्यांना मिळतो. सकाळी लवकर उठून भेंडी तोडणे व दुपारनंतर त्याची मार्केटला विक्री करणे यामुळे ग््रााहकांना ताजा व स्वच्छ माल मिळत असल्यामुळे या परिसरातील भेंडीला पुणे येथे खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. रोजच्या रोज मिळणारा रोख पैसा कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थेला बळकटी देत आहे.

भेंडी पिकाचे व्यवस्थापन करणे तसे किचकट काम आहे. पण, घरचे सर्व सदस्य शेतात राबत असल्याने मजुरीचा खर्च मर्यादित येतो आहे. मी दहा गुंठे क्षेत्रात भेंडीचे पीक घेतले आहे. दिवसाआड साधारणतः 40 ते 50 किलो भेंडीचे उत्पन्न मिळते आहे.

तात्यासाहेब गुळुमकर, भेंडी उत्पादक शेतकरी, कोऱ्हाळे बुद्रुक, (ता. बारामती)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news